हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये गणेशोत्सव , हुतात्मा दिन,शिक्षक दिन व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न .

 

हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये गणेशोत्सव , हुतात्मा दिन,शिक्षक दिन व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न .

.


सातारा, दि.11 -प्रा.अजय शेटे 

वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थी गणेशोत्सवाची मोठी धामधूम चालू झाली आहे.यावेळची  देखणी श्री  गणेश मूर्ती वरिष्ठ शिक्षक श्री.आर. बी.काळे व श्री .पी. जे.पाखले सर् यांनी भेट दिली असून,श्री गणेश चतुर्थी दिवशी सकाळी तिची प्रतिष्ठापना विश्वस्त विश्वासराव काळे ,सतीश शेटे,अशोक भंडारे,गजानन शेटे ,प्राचार्य डी.जे.फडतरे,पर्यवेक्षिका बी.एस.माने.मॅडम,पर्यवेक्षक एस.आर.जाधव,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. सौ. आर.आर.बडवे,,मुख्याध्यापिका शितल शिंदे,गणेशोत्सव कार्याध्यक्ष आर.बी.काळे,खजिनदार आर.एस.जगदाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

दि.5 सप्टेंबर रोजी ' शिक्षक दिना निमित्त संस्थेतर्फे सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी विद्यादेवी श्री सरस्वती व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी झालेल्या सन्मान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. जे.कांबळे सर् यांनी केले,शिक्षक मनोगतात प्रा. ए. व्ही.शेटे यांनी प.महाराष्ट्रातील एकल शिक्षण संस्थांचा इतिहास कथन केला. यावेळी डॉ.पंकज पवार  सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.संस्था विश्वस्त मध्ये श्री.सतीश शेटे,गोविंद भंडारे,विश्वासराव काळे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हेमंत पेठे यांनी आपले मनोगत व्यक्त करून वेदांतील ऋचा व गुरू परंपरा कथन केली. आभार प्रदर्शन एस.आर.जाधव यांनी मानले. वंदे मातरम् सौ.आर.  वाय.भिंगारदिवे व आर. आर.  बडवे यांनी गायिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी श्रीरंग दुबळे यांचे मोठे सहकार्य लाभले.

दि.9 सप्टेंबर रोजी ' हुतात्मा दिन ' कार्यक्रमाचे आयोजन शाळा संकुलात करण्यात आले.यावेळी हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या पुतळ्याचे पूजन संस्था विश्वस्त यांच्या तर्फे करण्यात आले.ध्वजवंदन विश्वस्त विजय म्हामणे यांच्या हस्ते करण्यात आले.या नंतर सजविलेल्या गाडीतून हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या प्रतिमेची सर्व गावातून शोभा फेरी काढण्यात आली.हुतात्मा चौक येथे चौथरा पादुका पूजन करण्यात येवून, हुतात्मा स्मारक येथे क्रांती ज्योत स्तंभ व हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.यावेळी ए.जी.भंडारे सर यांनी नऊ हुतात्म्यांच्या जयघोष करणाऱ्या घोषणा दिल्या.या नंतर शाळा संकुलात येवून विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपली प्रेरणादायी भाषणे सादर केली.या यानंतर श्री गणेश पूजा व आरती करण्यात येवून सर्वांना गोड प्रसाद वाटप करण्यात आले.यावेळी अमीर खान मेटकरी ,फलटण यांनी स्वतः बनवलेल्या युद्ध तोफेची प्रतिमा शाळा संकुलाला भेट दिली.तसेच या वेळी महाराष्ट्र राज्य पातळी वरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत निवड झालेल्या  चि.सार्थक प्रशांत कुलकर्णी या विद्यार्थ्यांचा संस्था विश्वस्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दि.15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन ही मोठ्या उत्साहात शाळा संकुलात साजरा करण्यात येवून, विश्वस्त सचिन काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमांना संस्था विश्वस्त प्रशांत शेटे,नितीन जाधव,संजय येवले,संतोष कांबळे,उमेश देशपांडे, डॉ.गिरीश जोशी , म.फुले प्राथमिक शाळा , हुतात्मा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी हजर होते.

शालेय गणेशोत्सव निमित्त श्री गौरी पूजन, वक्तृत्व ,निबंध,चित्रकला,हस्ताक्षर स्पर्धा तसेच रेकॉर्ड डान्स,लेझिम, गजी,टिपरी ,राधेचा माठ असे संगीतमय नृत्य  प्रकार श्री गणेश विसर्जन  शाही मिरवणुकीत आयोजित करण्यात येणार आहेत.

Comments