आमदार साहेब तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही चुकलातचं , ?

 


       आमदार साहेब तुम्ही  पुन्हा  एकदा  तुम्ही        चुकलातचं , ?


           उंब्रज दि.१५ :- रविंद्र वाकडे  आपला सातारा  विशेष लेख .

    आमदार साहेब तुम्ही चुकलातचं, ?

राजकीय आणि व्यवसायीक दृष्टीने सातारा जिल्ह्यात सर्वात महत्त्वाची बाजारपेट अशी  उंब्रज चि ओळख आहे ,प्रथम राष्ट्रीय काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी चा बालेकिल्ल्या अशी ओळख ही आहे,मात्र ही ओळख फक्त राजकीय दृष्टीने राहिली गेली 20 वर्ष उंब्रज हे कराड उत्तर मतदारसंघात मा आमदार आनि सहकार, तसेच पालकमंत्री राहिलेलं मा बाळासाहेब यांनी उंब्रज च्या विकासासाठी हवे तसे लक्ष दिले नाही , जसा हवा तसा विकास होण्यापासून उंब्रज हे वंचितच राहील आणि उंब्रज कर यांचा वापर हा फक्त निवडणूक  जिंकून येणे या पुरता मर्यादित राहिला, वेळोवेळी फ़क्त पोकळ आश्वासन देणं एवढं काम झालं, आता hi सन २०२४ मध्ये  उब्रज करांच्या  घरावर गाढवांचा नांगर फिरणार असे जाहीर झाले आहे आणि या वेळी सुद्धा आमदार साहेब उंब्रज मध्ये लक्ष देणार नाहीत .?????????




 गेली 20 वर्षा पूर्वी 2004 मध्ये हि उंब्रज  वर गाढवांचा नांगर फिरवला  गेला आणि आता 20 वर्षांनंतर पुन्हा परत तेच घडणार आहे त्या वेळीची  लोक संख्या आणि आता ची या मध्ये आज जमीन आसमान चा फरक आहे अनधिकृत पणे उंब्रज ची लोक संख्या ही सुमारे 45 ते 50 हजार   च्या दरम्यान असेल,उंब्रज मध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांनाच प्रमाण हे खूप मोठं आहे उंब्रज च्या जवळ पास सुमारे 40 खेडेगावे आहेत आणि त्यांना सर्व बाजूनी उंब्रज ही अतिशय जवळ ची आणि मोठी बाजारपेठ आहे ,तसेच मुलांच्या शिक्षणा च्या आवश्यक ते मुळे उंब्रज मध्ये स्थायिक होणे हे अत्यंत गरजेचे ठरते आहे,या सर्व याबाबतीत विचार केला तर आज उंब्रज हे सातारा  जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ  अशी ओळख निर्माण झाली असती मात्र जाणीव पुर्वक उंब्रज च्या विकासात अडथळा आणला गेला आणि उंब्रज हे  सर्व विकासा पासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले त्यावेळी ही मा आमदार,यांनी या कडे लक्ष दिले नाही नंतर सुमारे 6 वर्षा पूर्वी ही उंब्रज च्या बाजारपेठ मधील अतिक्रमणे काढताना ही बाजारपेठ वाचवता आली असती मात्र त्यांनी या वेळी देखील या कडे लक्ष दिले नाही आणि  तब्बल दुसऱ्या वेळी  संपूर्ण बाजारपेठ ही उध्वस्त करण्यात आली ,पहिली वेळ उंब्रज मध्ये उड्डाण पुलाच्या ऐवजी भरीव पूल करून  जाणीव पुर्वक उंब्रज चे 2 भाग  केलं नंतर उंब्रज ची बाजारपेठ  उध्वस्त  झाली आणि आता परत एकदा उंब्रज मध्ये नवीन पुलाचे काम चालू होणार आहे या  बाबत अजून ही उंब्रज चे ग्रामस्थ बेसावध आहेत ? की  जाणीवपूर्वक  ठेवले गेलं आहेत ? उंब्रज सोन्यासारखी बाजारपेठ उध्वस्त झाल्या मुळे  उंब्रज  संपूर्ण खच्चीकरण  झाले आणि संपूर्ण उंब्रज कर हे हे मोठ्या आर्थिक अडचणी मध्ये सापडले  आणि आता उंब्रज ची अवस्था ही भिक नको पण कूत्रे आवर अशी  झाली आहे या  वेळी जर उंब्रज करांच्या वर पून्हा एकदा जर का  गाढवांचा नांगर फिरवला गेला तर उंब्रज बाजार पेठ ही पूर्णपणे संपून जाईल  ,सर्वात महत्त्वाचे बाजारपेठ, राजकीय दृष्टीने महत्त्वाचे,  व्यापारी दृष्टीने ही महत्त्वाचं अशी ओळख असणार्या उंब्रज ही परिस्थिती ही 5 नवरे असून  सुद्धा एका विधवे प्रमाणे राहत आहे , 2  खासदार  एक आमदार ,पालकमंत्री  माजी मुख्यमंत्री अशा दिगग्ज नेत्यांच्या  जवळ असून देखील मागास राहिले आहे .द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी होती तरी तिला ही वस्त्र हरणाला सामोरे जावे लागले अगदी त्याच प्रमाणे उंब्रज ची परिस्थिती  निर्माण झाली आहे. गेले काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री यांनी नितीन गडकरी यांना उड्डाण पूलाच्या बाबत पत्र दिले की लगेच  मा आमदार पाटील यांनी ही मी गडकरी यांना पत्र दिले होते असे जाहीर  केलं मात्र माजी मुख्यमंत्री हे कराड दक्षिण मतदार संघात असून सुद्धा त्यांनी कराड  उत्तर चा प्रश्न हातात घेतला मात्र गेली 20 वर्ष तुम्ही या मतदार संघात आहे आज पर्यंत तुमचं लक्ष याकडे का नाही गेलं हा प्रश्न उपस्थित होत आहे तुम्ही रोज या रस्त्यावरून जात असताना तुम्हाला  दिसलं नाही का कज तुम्ही जाणीवपूर्वक इकडे पाहिले नाही की तुम्हाला उंब्रज डेव्हलप झालेले रुचत नाही हा  विषय समोर येतो ना मग आमदार साहेब  तुम्ही खरोखरच चुकला की विसरला की  नाटक केलं  केलं,? पालकमंत्री असतानाच तुम्हाला खूप काही करता येत होतं आणि  ते  केलं असतं आणि झालंही असत मात्र तुम्हाला उंब्रज चा विकास करून द्यायचा नाही आहे 2 दिवसापूर्वी  आज पर्यंत तूमच्या सोबत असनारा मोठा गट  उपमुख्यमंत्री मा अजित दादा  पवार यांच्या स्वागताला  मोठ्या ताकदीने उभा राहतो या मध्ये तुमचं अस्तित्व कुठेही जाणवल नाही  हे विशेष  विचार करण्याची गोष्ट नक्कीच आहे  या वरून एवढं  नक्कीच की तुम्ही कुठं तरी चुकला आहातच ,?

राजकीय आणि व्यवसायीक दृष्टीने सातारा जिल्ह्यात सर्वात महत्त्वाची बाजारपेट अशी  उंब्रज चि ओळख आहे ,प्रथम राष्ट्रीय काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी चा बालेकिल्ल्या अशी ओळख ही आहे,मात्र ही ओळख फक्त राजकीय दृष्टीने राहिली गेली 20 वर्ष उंब्रज हे कराड उत्तर मतदारसंघात  असणारे गाव हे फक्त नावालाच राहिल्रे आहे .



आमदार ,पालकमंत्री  माजी मुख्यमंत्री अशा दिगग्ज नेत्यांच्या  जवळ असून देखील उंब्रज चा विकास अजूनही हवा तसा  झाला नाही आणि या पुढे होईल अस वाटत ही नाही ,गेली कित्येक वर्ष आपण कराड उत्तर मधून उंब्रज च्या मतदानावर निवडून आला या गावातील जनतेने तुम्हाला वेळोवेळी निवडून दिले त्याची परतफेड तुम्ही उंब्रज आणि परिसरातील नागरिकांच्या आवश्यक गरजा विचारात घेऊन उंब्रज गे गाव आज पर्यंत नगर पंचायत मध्ये परीवर्तन करून घेतले असते सुमारे ६ वर्षा पूर्वी उंब्रज ची बाजारपेठ अतिक्रमण मोहिमे मध्ये पडून टाकली  या नंतर या ठिकाणी आपण पालकमंत्री असताना साहेबांच्या नावानी आपल्या फंडातून भव्यदिव्य असे व्यापारी संकुल आणि शासकीय कार्यालय याची उभारणी केली असती उंब्रज मसूर कराड बस ची मागणी केली  होती ती आपण करू शकला नाही आपल्या सोबत सातारा जिल्ह्यातील अभ्यासू  खासदार मा पाटील साहेब होते आपण एक शब्द टाकायचा अवकाश कम झालेच पण आपण ते केले नाही अगदी त्याच प्रमाणे गेली 20  वर्ष तुम्ही उंब्रज च्या महामार्गावरून जात आणि येत आहात त्यावेळी तुम्हाला उंब्रज मध्ये होत असणारी वाहतुकीची कोंडी अपघात नाही दिसले का  तुम्हाला उंब्रज पेक्षा  आपल्या साखर  कारखान्या समोर होणारी वाहतुकीची कोंडी दिसली मात्र उंब्रज मधील अडचण नाही दिसली  आणि हे सगळ दिसत असूनही कळतय पण वळत नाही  हा विचार करून उंब्रज मध्ये  हवा असणारा उड्डाण पूल हा चक्क चोरून आपल्या कारखान्यावर घेतला अस  बोलन वावग ठरणार नाही  ना ठीक आहे तुम्ही तिकडे  घेतला मात्र त्या  बाजूनी जाणारा सर्विस रोड वरून कधी  प्रवास केला का ?

 खड्यांनी पूर्ण भरलेला हा रस्ता आणि यावरून प्रवास करताना वाहन चालकांना होणारा त्रास याचा विचार कधी केलाच नाही मग तुम्ही आमच्या उंब्रज च विचार  तो काय करणार  ना हा प्रश्न समोर उभा राहातो आपण मनावर घेतले असते आणि खासदार साहेब यांना विश्वासात  घेऊन उंब्रज  मध्ये उड्डाणपूल मंजूर करून घेऊ शकला असता पण आपण तस नाही केल .सुमारे 5 0  हजार ची नोंद नसलेली उंब्रज ची लोकसंख्या आहे आणि मतदान कमी आहे तुम्ही  नवीन लोकांच्या नोंदी ग्रामपंचायत ला करण्यासाठी भाग पाडणे आवश्यक होते . उंब्रज ची लोकसंख्या ही रोज वाढतच आहे त्याच बरोबर त्यांच्या गरजा ही बरोबर गर्दी वाढली  घरे वाढली लोकांचं येण जाण वाढल मग रस्ते  वाढले पाहिजेत बाजारपेठ मोठी झाली पाहिजे  सर्विस रोड मोठा झाला पाहिजे सर्विस रोड ला गावात येणाऱ्या वाहनाच्या साठी पुरेसी पार्किंग व्यवस्था झाली पाहिजे या सर्विस  रोड वरून मोठ्या प्रमाणात उस वाहुतुक करणारी वाहने  जात असतात  या मुळे अनेक अपघात झाले आहेत आणि होत आहेत , याला जबाबदार  कोण , कराड मध्ये चांगल्या स्थितीत असणारा उड्डाण पूल पाडून नवीन प्रकारचा उड्डाणपूल केला जात आहे मग उंब्रज करांच्या मागे भराव पुलासाठी  जबरदस्थी का केली जात आहे  या  मागे या ठेकेदाराचा बोलावता धनी कोणी तरी आहे आणि त्याला उंब्रज मध्ये उड्डाणपूल  होऊ द्यायचा नाही अस ही असू शकत ना जेणे करून इतर सर्व गावावर उड्डाणपूल होत आहेत उंब्रज हे गाव अतिशय मोठे आहे हायवेच्या दोन्ही बाजूला शाळा बाजार पेठ  हॉस्पिटल आहेत  अचानक काही घडल तर त्या वेळी हायवे च्या पलीकडे जाणे अतिशय कठीण होत आहे  रस्ते  विकास महामंडळ यांनी उंब्रज आणि परिसरातील  ग्रामस्थांना आणि स्थानीक लोकप्रतिनिधी  विचारात घेऊन उंब्रज मध्ये उड्डाणपूल हवा का याची माहिती  घेणे आवश्यक आहे माजी मुख्यमंत्री मा पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी गडकरी यांना या बाबत योग्य ती माहिती दिली आहे मात्र तरी सुद्धा  हा प्रस्तःव  केवळ उंब्रज हे गाव विकासापासून जाणीवपूर्वक वंचींत राहावे अस मत दिसत आहे  हे अस का आणि कशा साठी या बद्दल लोकप्रतिनिधी यांनी जनतेच्या समोर येऊन या बाबत योग्य तो खुलासा करावा  एवढ्या  माहिती वरून तरी बोध घेऊन उंब्रज करांच्या मागणी कडे राजकारण सोडून एक आपल हक्काच गाव आहे अस समजून या कडे लक्ष द्यावे अन्यथा सर्व उंब्रज कर हे येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्यासाठी मागेपुढे करणार नाहीत  , आता जे आंदोलन चालू आहे ते थांबणार नाही हे निश्चित आहे.

Comments