सौ.अनिता विकास गायकवाड वाठार किरोली जिल्हा परिषद गटाला एक नवा चेहरा .

                        


सौ.अनिता विकास गायकवाड वाठार किरोली  जिल्हा परिषद गटाला एक नवा चेहरा .    
     

सातारा, दि.13  :-  रवी वाकडे

सौ.अनिता विकास गायकवाड वाठार किरोली जिल्हा परिषद गटाला एक नवा चेहरा विकास अण्णा हे अगोदर शिवसेनेच्या माध्यमातून काम करत होते मात्र आता गेली कित्येक वर्षा पासून मा आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली  भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत.
 तसेच मा विक्रम पावसकर  यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात हिंदू एकता आंदोलनाचे हे काम करत आहेत, 

कित्येक वर्षांपासून या भागात कसलीही विकास कामे केली गेली नाहीत मात्र आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत तर नवीन विकास कामे मंजूर झाली आहेत या मध्ये सौ अनिता वहिनी ही महिलांच्या स्वाभिमानी सखी महिला मंच यासाठी काम करत आहेत,




 सौ. समता ताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी सखी महिला मंचच्या माध्यमातून  महिलांच्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत,  तसेच त्या बचत गट आणि , उमेद ग्रामसंघ कोषाध्यक्ष पदी काम करत आहेत,
वहिनी साहेब यांच्या रूपाने या जिल्हा परिषद वाठार किरोली या  मतदार संघात एक नवीन अभ्यासु व्यक्तीमत्व या मतदारसंघात मिळत आहे मा मनोज दादा यांच्या  मार्गदर्शना नुसार जिल्हा परिषद वाठार किरोली मतदारसंघात विविध विकास कामे करायची आहेत, जिल्हा परिषद वाठार किरोली गटासाठी उमेदवारी मिळावी  अशी मागणी जिल्हा परिषद वाठार किरोली या  मतदार संघातून केली जात आहे .
मा.आ.मनोजदादा घोरपडे यांचे कट्टर कार्यकर्ते असून,सामाजिक कार्यात ही त्यांचा पण अतिशय हिरीहिरीने सहभाग असतो.
त्यामुळे त्यांच्या कार्याचे  सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments