उंब्रज मधील प्रलंबित पारदर्शक पुलासाठी दिल्ली पर्यंत जाणार. मा.ना. मनोजदादा घोरपडे





 उंब्रज मधील प्रलंबित  पारदर्शक पुलासाठी दिल्ली पर्यंत जाणार. मा.ना. मनोजदादा घोरपडे


उंब्रज  दि 15 :- रवींद्र वाकडे

उंब्रज येथे उड्डाणपूल झाला पाहिजे या साठी उंब्रज आणि परिसरातील  नागरिक एकवटले ,उड्डाणपूल मंजूर नाही केला तर बेमुदत उंब्रज बंद आणि तीव्र आंदोलन  करणार. मनोज दादा घोरपडे.

       


   

गेली २वर्षा पासून उंब्रज मध्ये उड्डाणपूल करावा या साठी उंब्रज मधील नागरिक हे मागणी करत आहेत. येथे सतत होणारे अपघात आणि वाहतुकीची कोंडी  आणि नाहक बळी जाणारी जनता याला जबाबदार कोण असा प्रश्न या वेळी उपस्थित  केला  या  वेळी  मारूती शेठ जाधव , महेश बाबा जाधव निवास थोरात सरपंच माणिक जाधव विकास जाधव शंकरराव शेजवळ  आणि शेकडो च्या संख्येने उंब्रज आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते  .

  या वेळी बोलताना  निवास थोरात कॉंग्रेस कराड उत्तर तालुका अध्यक्ष .  उंब्रज येथे उड्डाणपूल करण्यात यावा यासाठी  मा पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी मा नितीनजी गडकरी याना वेळोवेळी पत्रव्यवहार करून उंब्रज मध्ये उड्डाणपूल  किती आवश्यक आहे हे सांगून त्याना याबाबत आवश्यक त्या सूचना आणि माहिती दिली आहे आणि बाबा स्वता या बाबतीत चा पाठपुरावा करत आहेत.

                      


                

उंब्रज येथील उड्डाणपूलासाठी कराड उत्तर चे आमदार आनि माजी पालकमंत्री मा बाळासाहेब पाटील हे   इच्छुक दिसत नाहीत  कारण की आज येथे झालेल्या आंदोलनात त्यांची उपस्थित सर्व ग्रामस्थांना अचंबीत करणारी होती   उपस्थित नागरिकांच्या मध्ये या बाबत अनेक तर्क वितर्क केले जात होते   प्रत्येक वेळी मते मागण्यांसाठी पूढे पुढे करणारे आज उंब्रज च्या जिव्हाळ्या च्या प्रश्नांवेळी तलवार म्यान करून बसले आहेत.!


महामार्ग ठेके दार हा ग्रामस्थांच्या वर दमदाटी करून काम चालू करत आहे आणि अरेरावी ही करत आहे  तेव्हा उंब्रज मध्ये कराड च्या धर्तीवर आधारित सेग मेंट पूलच झाला पाहिजे अन्यथा आम्ही रस्त्याचे काम करू देणार नाही  या साठी आम्ही  जे काही करावं लागेल ते करणार आहोत  हा विषय एकट्या उंब्रज चा नाही तर आसपास असणाऱ्या ४५ गावांचा आहे.

Comments