खासदार डॉ.अजित गोपछडे यांची सन्मान यात्रा कराड मध्ये येणार.



                                  
                

खासदार डॉ.अजित गोपछडे यांची सन्मान यात्रा कराड मध्ये येणार.
  
     


कराड , दि.14 - प्रसाद वाकडे
भक्ती स्थळ राजूर (अहमदनगर ) ते शक्ती स्थळ श्री क्षेत्र मंगळवेढा चालणारी वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा रविवार दि.15 सप्टेंबर ,2024 रोजी स.10 ते दु .2 या वेळेत कृष्णाबाई मंगल कार्यालय, पंताचा कोट, सोमवार पेठ,कराड येथे येणार आहे.


                                

सदर सन्मान यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यसभा खासदार मा.अजित गोपछडे हे यावेळी हजर राहणार आहेत.

यावेळी नूतन खासदार साहेब हे समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव यांच्या समोरच्या अडचणी समजून घेणार आहेत.तसेच समाजातील मान्यवर लोकांचा यथोचित सत्कार करून सन्मान करणार आहेत.तरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी सदर कार्यक्रमास वेळेत हजर रहावे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments