अष्ठविनायक गणेश मंडळांच्या रामलल्ला रूपातील गणेश मूर्तीचे वडूजकर भक्तांना आकर्षण.


अष्ठविनायक गणेश मंडळांच्या रामलल्ला रूपातील गणेश मूर्तीचे वडूजकर भक्तांना आकर्षण.
सातारा, दि.13 - प्रा अजय शेटे 
वडूज मधील ओंकार मंगल कार्यालय जवळ असलेल्या अष्टविनायक गणेश मंडळाची मूर्ती येथील भक्तांना मोठी आकर्षणाची ठरली आहे.
या मंडळाचे अध्यक्ष अक्षय देशमाने,उपाध्यक्ष विघ्नेश चव्हाण ,कार्यकर्ते यश कोकाटे, ओंकार शेटे,आदित्य शेटे,तेजस काळे,वेदांत काळे,सूरज खुडे,धनाजी जगदाळे,सागर कट्टे,गणेश कुंभार,शुभम वायदंडे यांचे सहकार्य लाभले आहे.
तसेच मंडळाला श्री. धनंजय काळे, डॉ.महेश माने,शिवाजी खराडे यांचेही मंडळास मार्गदर्शन लाभत असून,अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत.
या मूर्तीचे मूर्तिकार गणेश कुंभार हे याच मंडळाचे कार्यकर्ते असून, हि श्री रामलल्ला स्वरूपातील मूर्ती तयार करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे हात लागले आहेत.
त्यामुळे मोठ्या भक्तिभाव पूर्ण वातावरणात हि मूर्ती तयार केली गेली असून, हि मूर्ती वडूज कर नागरिक यांच्या आकर्षणाचा मोठा केंद्र बिंदू ठरली आहे.
याच बरोबर, वडूज शहरात शिव गर्जना ,व्यापारी अशा मोठ्या मंडळांनी पण गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात करून अनेक स्पर्धा व खेळ यांचे आयोजन करण्यात येत आहे.
गौरी सजावट मध्ये वाघोलीकर ज्वेलर्स यांचे  शबरीचे बोरे खाणारा श्रीराम,प्राचार्य मोहन पोतदार यांचे राधाकृष्ण यांच्या अवखळ लिला ,सुनिल कांबळे,श्री.हनुमंत  महामुनी,कैलास लंगडे यांचे उरीचे श्री गणेश मंदिर,,अमित गाडवे यांचे लग्नातील गोंधळ जागरण प्रथा असे देखावे तसेच वायदंडे साहेब यांच्या कुटुंबातील गृहिणींनी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात उभ्या गौरींची सजावट केली आहे.ती पाहण्यासाठी आबालवृद्ध  व महिला वर्ग गर्दी करत आहे.

Comments