क्रांती ज्योत स्तंभाची दुरुस्ती लवकर व्हावी.हुतात्मा स्मारक, वडूज मधील प्रेरणा स्तंभाची दुरावस्था.





क्रांती ज्योत स्तंभाची दुरुस्ती लवकर व्हावी.हुतात्मा स्मारक, वडूज मधील प्रेरणा स्तंभाची दुरावस्था.

सातारा, दि.10 - प्रा अजय शेटे 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक व त्यांच्या कार्याची प्रेरणा कायम मनात रहावी.या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे वडूज येथे जुन्या कचेरी जवळ हुतात्मा स्मारक उभे करण्यात आले आहे.या गोष्टीला आता बरेच वर्षे झाली असून,त्याच वेळी या स्मारकासमोर प्रेरणा मशाल ज्योत स्तंभ उभा आहे.सद्य स्थितीत या  सिमेंट  व स्टील  वापरून उभारलेल्या स्तंभाची वर पासून मध्यापर्यंत मोठी दुरावस्था  होऊन ,त्यास मोठ्या भेगा पडून,अनेक ठिकाणी तडे गेले असून,सदर स्तंभ धोकादायक बनला आहे.
वास्तविक या ठिकाणी अनेक शासकीय व  निम शासकीय कार्यक्रम होत असतात व त्यावेळी या मशाल स्तंभाला खालील बाजूस पुष्पचक्र अर्पण करून, हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले जाते.या वेळी अनेक मंत्री,नेते,उच्च स्तरीय अधिकारी ,स्थानिक वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक स्त्री - पुरुष हजर असतात. ते सर्व जण सदर स्तंभाखाली उभे असतात.त्यावेळी विद्यार्थी - विद्यार्थिनी हे वाद्यवृंद वाजवून मानवंदना देण्यात येते.
कदाचित अशा प्रसंगी सदर स्तंभाचे निसटत चाललेले सिमेंट चे मोठे तुकडे निसटून,खाली उभ्या असलेल्या मान्यवरांच्या डोक्यावर तसेच अंगावर पडून मोठी दुर्घटना होऊ शकते.
तरी वेळीच सावध होऊन सदर स्तंभाचा बांधकाम आयुष्य अहवाल तपासून ,सदर स्तंभ नव्याने उभा करणे अथवा तातडीने त्याची भक्कम दुरुस्ती करणे आवश्यक आहे. 
अशा आशयाचे निवेदन वडूज कर नागरिक यांच्या वतीने नगर पंचायत , वडूज यांच्याकडे जमा करण्यात आले आहे.तसेच अनेक वेळा  अनेक  समस्यांचे निवेदन देवून सुद्धा प्रस्थापित यंत्रणा सदर सबंधित विभागास तातडीने सूचना देवून ,जनतेच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत नाही.तसेच निष्काळजीपणा करून टाळाटाळ करण्यात येत आहे. जर या पुढे काही दुर्घटना झाल्यास सदर जबाबदार अधिकारी व कार्यालय यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा खटला दाखल करण्यात येणार असल्याचे अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष बोलून दाखवले आहे.

Comments