4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस

 



             4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस 



कराड दि ४  :- प्रतिनिधी 

 पृथ्वीवरील जैवविविधता राखण्यासाठी तसेच पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी टिकवून ठेवण्यासाठी विविध उपक्रम साजरे केले जातात. त्यामध्ये निसर्ग दिनाचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम असतो

 चार सप्टेंबर व 22 फेब्रुवारी हे वर्षातील दोन दिवस राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून साजरे केले जातात. तसेच 1 एप्रिल ते 7 एप्रिल हा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो.

 वन्यजीवांची माहिती व्हावी तसेच त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते .

नागरिकांना वन्य प्राण्यांच्या बद्दल माहिती असणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे .वन्य प्राण्यांचा अधिवास टिकून ठेवणे आवश्यक आहे .

वाढत्या लोकसंख्येमुळे निसर्गावर मोठ्या प्रमाणात आक्रमण होत आहे त्यामुळे जैवविविधता धोक्यात येते .वन्य प्राण्यांच्या मध्ये जीव साखळी ही अन्नसाखळीवर अवलंबून असते त्यासाठी निसर्ग संवर्धन करणे आवश्यक आहे .

निसर्गातील मानवाचा हस्तक्षेप कमी करून स्थानिक प्रजाती टिकल्या पाहिजेत तरच अन्नसाखळीतील घटक टिकाव धरू शकतात .

तृणभक्षक प्राण्यांना गवत ,झाडोरा अन्न म्हणून लागते .

गवताळ प्रदेश व झाडोरा संरक्षित ठिकाणी असेल तर तृणभक्षक प्राणी मोठे स्थलांतर करत नाहीत.

 मांसाहारी प्राणी हे प्रामुख्याने तृणभक्षक प्राण्यांच्या वर अवलंबून असतात त्यांचे स्थान अन्नसाखळीमध्ये शिखर स्थानावरती असते .




🌴काही अहवालामध्ये असे मत मांडले आहे की 1000 प्रकारच्या प्रजाती या धोक्याच्या पातळीवर आहेत .वनक्षेत्रावर मानवाचा हस्तक्षेप व पर्यावरणीय बदल यामुळे या प्रजाती धोकादायक स्थितीत आहेत, यामध्ये आपण सुधारणा केली नाही तर या प्रजाती नामशेष होतील.

आतापर्यंत अनेक प्रजाती पृथ्वीतलावरून नामशेष झालेले आहेत यासाठी समाजामध्ये जागरूकता येणे अत्यंत आवश्यक आहे .

🌲राष्ट्रीय वन्यजीव दिवस हा आपण उत्साहात साजरा करून मानवाची वन्य प्राण्यांच्या बद्दल असणारी जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे तरच हा निसर्गामधील अनमोल ठेवा आपण पुढील पिढीला देऊ शकू.

🌲 राष्ट्रीय वन्यप्राणी दिवसाचा इतिहास 🌲

राष्ट्रीय वन्यजीव दिन 2005 पासून साजरा करण्यात सुरुवात केली. कॉलिन  पैजे (कॉलिन Paige)या प्राणी वर्तनवादी अभ्यासक व परोपकारी मानवतावादी लेखिका यांनी 4 सप्टेंबर हा दिवस वन्य प्राणी दिवस म्हणून 2005 सालापासून साजरा करण्यात सुरुवात केली.

 स्टेव्ह इर्विन ( Steven Irwin)  या वन्यजीव संरक्षक यांचा मृत्यू 22 फेब्रुवारी 2006 साली झाला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ म्हणून 22 फेब्रुवारी हा दिवस सुद्धा वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच एक एप्रिल ते 7 एप्रिल हा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 

 वन्य प्राण्यांच्या अस्तित्वासाठी जो संघर्ष मानव व वन्यप्राणी यांच्यामध्ये होतो आहे तो योग्य प्रकारे हाताळला जावा, त्यासाठी समाजाने सामूहिक जबाबदारीच्या भावनेने वन्य प्राण्यांना संरक्षण व त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक जीवसृष्टी टिकवून ठेवली पाहिजे. या उद्देशासाठी स्टेव्ह इर्विन ( Steven Irwin ) यांनी आपले जीवन वाहिले .

नैसर्गिक अधिवास योग्य प्रकारे राखून वन्य प्राण्यांना संरक्षित अधिवास उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

 हा दिवस साजरा करताना ( Protect Wildlife Or Wildlife Conservation) " वन्यजीव संरक्षण किंवा वन्यजीव संवर्धन "या घोषवाक्याने हा दिवस साजरा केला जातो.

 राष्ट्रीय वन्यजीव दिवस हा साजरा करताना जैवविविधता व वन्यप्राणी यांचे वास्तव  समाजासमोर ठेवले पाहिजे .

 वन्यजीवांची आकडेवारी ही वन्यप्राण्यांच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा आहे .


🎇प्रत्येक वर्षी जवळ जवळ 30,000 प्रजातीय नष्ट होत आहेत ,म्हणजे प्रत्येक तासाला तीन प्रजाती नष्ट होतात 

🎇1970 ते 2010 या 40 वर्षात जगातील वन्यप्राण्यांची संख्या ही 52% नी कमी झाली आहे .

🎇चार बिलियन प्रजातीपैकी 99% प्रजाती धोक्याच्या पातळीवर आहेत .

🎇पृथ्वीवरील एकूण सस्तन प्राण्यांच्या पैकी 25% प्राणी नामशेष झाले आहेत,

🎇 तर 40 टक्के उभयचर प्राणी नष्ट झाले आहेत.

 🎇सहा पक्षांच्या पैकी एक पक्षी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत 

समुद्रामध्ये व्यापारासाठी यांत्रिक साधनांचा वापर करून मासे मासेमारी करण्यात येते. त्यामुळे समुद्रातील 85% पृष्ठवंशीय प्रजातीय नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यातील अधिकतम प्रजातीय नष्ट झाले आहेत.

 या सर्वांचे जतन करण्यासाठी वन्य प्राण्यांची वस्तीस्थाने सुरक्षित ठेवली पाहिजेत, वन्य जीवांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यांना आपल्या जीवनासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे वन्य प्राण्यांच्या अस्तित्वासाठी अनेक प्रश्न समस्या व अडथळे आहेत.

त्यातील पहिला अडथळा म्हणजे मानवाचे जंगल व वने यामध्ये वाढता हस्तक्षेप हा आहे त्यामुळे जंगलामध्ये वन्यजीव असुरक्षित झाले आहेत.

 दुसरा अडथळा म्हणजे वन्यप्राण्यांची भ्रमण मार्ग हा होय रस्ते, इमारती, जंगलतोड यामुळे वन्यप्राणी पशुपक्षी यांच्या भ्रमण मार्गात अडथळे निर्माण होतात.

 तिसरा अडथळा म्हणजे जैविक संचय (Bioaccumulation) होय .मनुष्य आपल्या भौतिक सुखासाठी विविध वस्तूंची निर्मिती करतात, त्या वस्तू प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वन्यप्राण्यांच्या शरीरात जातात त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या जीवनावर होतो.शेवटचा अडथळा म्हणजे वातावरणातील अनैसर्गिक बदल हे वन्य प्राण्यांना घातक ठरत आहेत 

या सर्व अडथळ्यांच्या वर योग्य उपाययोजना करून वन्यप्राणी संरक्षित करणे गरजेचे आहे. या सर्वांसाठी वन्यप्राणी जनजागृती करून त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

 हा दिवस किंवा सप्ताह आपणास कसा साजरा करता येईल?

1 वर्तमानपत्रे ,मासिके ,इतर माध्यमे इत्यादी ठिकाणी लेख लिहिणे .

2.चर्चासत्रे, परिसंवाद यांचे आयोजन करणे. 

3.प्राणी संग्रहालय, अभयारण्य उद्याने यांना विद्यार्थ्यांच्या सहभेटी देणे.

4. भित्तिपत्रके विविध स्पर्धा यांचे आयोजन करणे.



 सुनीलराव पानस्कर

 प्रमुख, कोयना पर्यावरण जागृती मोहीम 

अध्यक्ष, सह्याद्री   एडवेंचर्स,iपाटण

Comments