ग्लोबल इंग्लिश मेडिअम स्कूल &ज्युनिअर कॉलेज उंब्रज मध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा.उंब्रज दि 15 :- प्रसाद वाकडे


ग्लोबल इंग्लिश मेडिअम स्कूल &ज्युनिअर कॉलेज उंब्रज मध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा.
उंब्रज दि 15 :- प्रसाद वाकडे
ग्लोबल इंग्लिश मेडिअम स्कूल &ज्युनिअर कॉलेज उंब्रज मध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा.
  14 सप्टेंबर हा भारतभर हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.सकाळच्या सत्रात प्रथम सरस्वतीच्या पूजनाने हिंदी दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमासाठी स्कूल चे प्राचार्य श्री.देशमुख सर,उपप्राचार्य श्री.जगताप सर,प्रशासकीय प्रमुख सौ.पाटील मॅडम ,सर्व शिक्षक उपस्थित होते.हिंदी भाषा दिन याविषयी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विविधतेत एकता जपण्याचे काम हिंदी भाषा करते. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्व व वैशिष्ट्ये वेगवेगळ्या हिंदी सुभाषितामधून सादर केली.हिंदी दिनाच्या निमित्ताने विद्यालयामध्ये काही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये घोषवाक्य,हिंदी भाषेचा शब्दसंग्रह तरंगचित्रे यांचा समावेश करण्यात आला होता. सदर स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हिंदी दिनाचे प्रास्ताविक उपप्राचार्य श्री संतोष जगताप सरांनी केले तर हिंदी भाषा व महत्व विषय शिक्षक देशमुख सर व भोसले सर यांनी मनोगत मध्ये व्यक्त केले.आभारप्रदर्शन करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments