तहसील कार्यालय, वडूज मध्ये ग्राहक संरक्षण संघटना बैठकीचे आयोजन.ग्राहकांनी आपल्या समस्या निवारणासाठी हजर रहावे.
तहसील कार्यालय, वडूज मध्ये ग्राहक संरक्षण संघटना बैठकीचे आयोजन.
ग्राहकांनी आपल्या समस्या निवारणासाठी हजर रहावे.
सातारा, दि.08 :- प्रा.अजय शेटे.
राष्ट्रीय व महाराष्ट्र पातळीवर काम करणाऱ्या अनेक ग्राहक संघटनांची एकत्रित बैठक तहसील कार्यालय,वडूज मध्ये पहिल्या मजल्यावरील सभागृहात सोमवार , दि.16.11.2026 रोजी स.11.30 वा.आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला मा.तहसीलदार बाई माने मॅडम यांच्या सह तालुका पुरवठा निरीक्षक सौ. अनु जगताप व इतर सर्व शासकीय सेवा पुरवणाऱ्या कार्यालयांचे अधिकारी व व्यापारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व ग्राहकांनी वीज महामंडळ,रेशनिंग, एस टी महामंडळ,
खते - बियाणे ,इंधन, गॅस एजन्सी,भूमीअभिलेख,बँका,
वैद्यकीय,कृषी, सहाय्यक निबंधक,नगरपंचायत ,ग्रामपंचायत,लोक सेवा केंद्रे कार्यालय तसेच इतर सर्व आर्थिक पावत्या मिळणाऱ्या कार्यालय व व्यावसायिक आस्थापना या बाबत आपल्या काही समस्या अथवा तक्रारी असल्यास त्या लेखी स्वरूपात दोन प्रतीत घेऊन वरील वेळेत समक्ष हजर रहावे असे जाहीर आवाहन ग्राहक संघटनांच्या राज्य,जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment