शशिकांत गणपती वाकडे यांचे अल्पशा आजाराने निधन.

शशिकांत गणपती वाकडे यांचे अल्पशा आजाराने निधन.
मसूर दि 13:- प्रतिनिधी
लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते व भजनी मंडळाचे मार्गदर्शक ह.भ.प. शशिकांत गणपती वाकडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मसूर परिसरात व भजनी मंडळात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी मसूर (ता. कराड) येथील वैकुंठ स्मशानभूमीत माती व सावडणे विधी पार पडणार आहे.
त्यांच्या पश्चात परिवार, आप्तस्वकीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. लिंगायत समाज व भजनी मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

Comments