राष्ट्रीय स्वराज्य सेना लोकसभेच्या सर्व जागा लढवणार.राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल.
सातारा,दि.18 - संकेत महाजन
राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी स्थान केलेल्या व बासरी हे निवडणूक चिन्ह असलेला राष्ट्रीय स्वराज्य सेना हा पक्ष सन 2029 च्या येत्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढवणार असून,त्या दृष्टीने पहिल्या 21 उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार आहे.असे प्रतिपादन मा.संस्थापक अध्यक्ष यांनी नुकतेच केले आहे. लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेना मैदानात उतरली असून,
लोकशाही टिकवा, हुकूमशाही हद्दपार करा.या बुलंद घोषणेसह राष्ट्रीय स्वराज्य सेना आता लोकसभा निवडणुकीच्या मैदानात ठामपणे उतरली आहे.
सामान्य माणसाच्या हक्कासाठी, शेतकरी, कामगार, तरुण, महिला आणि वंचितांच्या न्यायासाठी लढणारा एक प्रामाणिक पर्याय म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेना जनतेसमोर येत आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल साहेब यांनी आज पत्रकारांशी बोलताना हि माहिती दिली की, लोकसभा निवडणुकीसाठी
या यादीमध्ये स्वच्छ प्रतिमेचे, जनतेसाठी काम करणारे, शिक्षित आणि तळागाळातून आलेले उमेदवार असतील. घराणेशाही, पैशाचा खेळ आणि हुकूमशाही वृत्तीला पर्याय म्हणून सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणे, हेच आमच्या पक्षाचे धोरण आहे, असे श्रीहरी बागल साहेब यांनी स्पष्ट केले.
तसेच इतर इच्छुक उमेदवारांना आवाहन पण केले असून,लोकसभेसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रामाणिक आणि जनसेवेची तळमळ असणाऱ्या उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधावा. उमेदवारांची निवड ही केवळ जनसेवा, प्रामाणिकपणा आणि लोकांमध्ये असलेली विश्वासार्हता यावर केली जाईल.
पक्षाचे चिन्ह हे बासरी असून,
बासरी हे प्रेम, शांती आणि एकतेचे प्रतीक आहे. त्याच विचाराने आम्ही देशात लोकशाही रुजवणार आहोत.
लवकरच पक्षाची अधिकृत उमेदवार यादी, जाहीरनामा आणि प्रचार दौरा जाहीर करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी ॲड.श्रीहरी बागल साहेब
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय स्वराज्य सेना,
मो. 9820305909 यावर संपर्क साधावा.असे आवाहन मुंबई कार्यालय कडून करण्यात आले आहे.
---
Comments
Post a Comment