गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची बीजे कोल्हापुरात रुजली ! लोकशाही आणि सहकार वाचवण्यासाठी राज्यभरातील दूध उत्पादकांसह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकवटले.
गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची बीजे कोल्हापुरात रुजली ! लोकशाही आणि सहकार वाचवण्यासाठी राज्यभरातील दूध उत्पादकांसह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकवटले.
कोल्हापूर दि 09 :- रवींद्र वाकडे
साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कौल डावलून आणि शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊन मागील दाराने 'गोकुळ' दूध संघावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारविरोधात कोल्हापुरात विराट 'संघर्ष मोर्चा' काढण्यात आला.
लोकशाही आणि सहकार चळवळ टिकवण्यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या लढ्यामुळे राज्याच्या सत्तापरिवर्तनाची सुरुवात कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीतून झाली असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सामान्य माणसाला लढण्याची नवी ऊर्जा
मोर्चादरम्यान उपस्थित नेत्यांनी राज्य सरकारच्या सहकारविरोधी धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. "आपण लढलो की जिंकतो आणि या न्याय्य लढ्याला जनता भक्कम पाठबळ देते, हा विश्वास या मोर्चाच्या निमित्ताने अधिक प्रबळ झाला आहे. न्यायासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाला गोकुळच्या या संघर्षाने एक नवी ऊर्जा आणि विश्वास दिला आहे," असे ठाम प्रतिपादन नेत्यांनी केले. गोकुळच्या या लढाईतूनच महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाची बीजे आज कोल्हापूरच्या मातीत रुजली असल्याचेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले.
"याचना नही, अभी रण होगा..."
सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. यावेळी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी "याचना नही अभी रण होगा, रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा" अशा आक्रमक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत सरकारला थेट आव्हान दिले. सहकार क्षेत्रातील स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी हा लढा यापुढेही अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
राज्यभरातील दिग्गज नेत्यांची मोर्चाला हजेरी.
या ऐतिहासिक संघर्ष मोर्चामध्ये कोल्हापूरसह राज्यभरातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील, सत्यजित पाटील-सरुडकर, आमदार ऋतुराज पाटील, राजीव आवळे, आमदार जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, विवेकानंद पाटील यांच्यासह हजारो शेतकरी, दूध उत्पादक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment