महामार्गावर धोकादायक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या 'रील स्टार' महिला पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी; जनतेचा तीव्र संताप.
महामार्गावर धोकादायक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या 'रील स्टार' महिला पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी; जनतेचा तीव्र संताप.
कराड दि 03 : रवी वाकडे
कराडमधील ज्या उड्डाणपुलावर भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी नियम धाब्यावर बसवून वाढदिवसाची रील बनवणाऱ्या महिला पोलीस अधिकारी सोनल पाटील यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यानच्या उड्डाणपुलावर भीषण दुर्घटना घडली होती. या संवेदनशील ठिकाणी रात्रीच्या वेळी नवीन कार उभी करून, बोनेटवर केक कापून आणि 'पायरो गन'मधून आतिशबाजी करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. कायदा रक्षकानेच वाहतुकीचे नियम आणि सार्वजनिक सुरक्षेला हरताळ फासल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे, असे पुढारी न्यूज च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
अशा प्रकारे जर कायदा पाळणारे पोलीस अधिकारीच स्वतः नियम मोडणार असतील, तर सर्वसामान्य जनतेने शांत न बसता खालील कायदेशीर पावले उचलली पाहिजेत:
• पुराव्यांसह तक्रार नोंदवा: घटनेचे व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड करा. पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात लेखी तक्रार द्या.
• निलंबनाची थेट मागणी: शासकीय शिस्तीचा भंग केल्याबद्दल वरिष्ठांकडे चौकशीची मागणी करा. दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची आग्रही मागणी करा.
• तक्रार प्राधिकरणाकडे धाव: पोलिसांच्या अशा मनमानी कारभाराविरुद्ध राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार करा. तात्काळ कारवाईसाठी गोळा केलेले पुरावे सादर करा.
• न्यायालयीन हस्तक्षेप: वरिष्ठ पातळीवर दखल न घेतल्यास न्यायालयात खाजगी तक्रार दाखल करा. कायदेशीर रित्या कारवाईचा बडगा उचला.
कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे कर्तव्य विसरून महामार्गावर स्टंट करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होऊन त्यांचे निलंबन झालेच पाहिजे, असा सूर जनतेमधून उमटत आहे.
Comments
Post a Comment