रहिमतपूर नगरपालिकेस 5 कोटीचा विशेष निधी मंजूर ,आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश.


रहिमतपूर नगरपालिकेस 5 कोटीचा विशेष निधी मंजूर ,आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश.
सातारा दि 07 :- रवी वाकडे
रहिमतपूर नगरपालिकेस 5 कोटीचा विशेष निधी मंजूर ,आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश.  
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे रहिमतपूर शहराच्या विकासासाठी  तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रहिमतपूर मध्ये 5 कोटींची विविध पायाभूत स्वरुपाची विकासकामे केली जाणार आहेत. यामुळे या शहराच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
रहिमतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार मनोजदादा घोरपडे सातत्याने  प्रयत्न करत आहेत. सरकारच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या प्रगतीसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी यापूर्वीदेखील भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. यात आता आणखी ५ कोटींच्या निधीची भर पडली आहे. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ‘रहिमतपूर नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी ५ कोटींचा विशेष निधी’ मंजूर करण्यात आला आहे.

या निधीच्या माध्यमातून रहिमतपूर  नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम व फर्निचरचे काम करण्यासाठी 3 कोटी रुपये, 
 काशीद गल्ली येथे दत्त मंदिर परिसरामध्ये नगरपालिकेचे सामाजिक बहुउद्देशीय सभागृह नूतनीकरण करणे 60 लाख रुपये, 
 नदाफ दफनभूमी विकसित करण्यासाठी 50 लाख रुपये, रहिमतपूर ब्रह्मपुरी येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी 40 लाख रुपये,
 नहरवाडी येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले. 

त्यामुळे या विकासनिधीच्या मंजुरीमुळे  रहिमतपूर मधील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. रहिमतपूर साठी ५ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल शहर वासीयांकडून आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.

Comments