उंब्रजच्या ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार यश बुद्धिबळ, योगासन स्पर्धेत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा


   


उंब्रजच्या ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार यश
 बुद्धिबळ, योगासन स्पर्धेत  शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा.



उंब्रज दि ०१  : रवी वाकडे 

उंब्रजच्या ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार यश, बुद्धिबळ, योगासन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकावली मानाची पदके; शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा.उंब्रज येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ व योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचे, एकाग्रतेचे आणि कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत विविध क्रमांक मिळविले.

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या ऋषभ मुळीक याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याचबरोबर विद्यार्थिनींच्या गटातही ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली. पूर्वा डांगे हिने प्रथम क्रमांक, वैष्णवी मोरेडी हिने द्वितीय क्रमांक, तर तनुश्री थोरात हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. या यशामुळे शाळेच्या बुद्धिबळ संघाची तालुकास्तरावर प्रभावी कामगिरी अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, तालुकास्तरीय योगासन स्पर्धेतही ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचा निवासी (Hostel student)असलेला विद्यार्थी कु . आरव हिंगसे याने आपल्या शारीरिक क्षमता, लवचिकता, संतुलन आणि एकाग्रतेचे उत्कृष्ट दर्शन घडविले. या स्पर्धेत आरव हिंगसे याने प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.



बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळापासून योगासनासारख्या शारीरिक व मानसिक संतुलन साधणाऱ्या स्पर्धेपर्यंत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शाळेच्या सर्वांगीण शिक्षणपद्धतीचे द्योतक मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, प्रशिक्षक तसेच पालक व यांच्या प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, उंब्रजच्या शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा अधिक बळकट झाली आहे.

Comments