मा संग्राम घोरपडे बापु यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाला जोड; वडगाव येथे भव्य नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.
मा संग्राम घोरपडे बापु यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाला जोड; वडगाव येथे भव्य नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.
उंब्रज दि 02 :- रवी वाकडे
मा. संग्रामबापू घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी मंदिर, वडगाव येथे भव्य नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा. संग्रामबापू घोरपडे यांच्या उपस्थितीत हे शिबिर उत्साहात पार पडले.
आरोग्यविषयक जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला. नेत्रतपासणीच्या माध्यमातून नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली, तर रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न ठेवता आरोग्यसेवा आणि रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.
या शिबिराच्या आयोजनासाठी आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच, कराड उत्तर तसेच स्वाभिमानी महिला सखी मंच, कराड उत्तर यांच्या वतीने नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, वैद्यकीय कर्मचारी, रक्तदाते, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment