हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज मध्ये आनंददायी शनिवार अंतर्गत अनोखा उपक्रम.
सातारा, दि.19:- प्रा.अजय शेटे
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज येथे शनिवार दि.17
रोजी स.7.45 ते 8.45 या वेळेत आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत श्री श्री विद्यालय ,औंध येथील व हल्ली मुंबई येथे रहिवास असलेले निवृत्त शिक्षक श्री . के. टी. कांबळे सर यांचे शिवचरित्र इतिहास, पोवाडा गायन,भजन गायन,विविध आवाजाची हुबेहूब नक्कल व मर्दानी खेळ प्रात्यक्षिके अशा एकत्रित बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या सौ .बी.एस.माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपप्राचार्या सौ.एस. पी.जोशी मॅडम,पर्यवेक्षक श्री. ए. एम.राऊत सर यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. व्हि. टी.पवार सर यांनी केले.ते म्हणाले की, कांबळे सर यांनी निवृत्ती नंतर पण आपल्यातील शिक्षक जागृत ठेवून,समाज प्रबोधनाचे मोठे काम हाती घेऊन, महाराष्ट्रातील सर्व शाळात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प करून,मोठे कार्य केले आहे.पाहुण्यांचा यथोचित सत्कार श्री.एम.बी.भोकरे सर यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
Comments
Post a Comment