श्री स्वामी समर्थ डेंटल हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी लिंगायत समाज बांधवांचा उत्साहात सत्कार.
कराड (सैदापूर) दि :- संकेत महाजन
येथील सैदापूर परिसरामध्ये नव्याने सुरू झालेल्या श्री स्वामी समर्थ डेंटल हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून स्थानिक लिंगायत समाज बांधवांसाठी एका विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने श्री उदय हिंगमिरे (भैय्या), श्री प्रमोद सुकरे सर, श्री तात्या शेटे, डॉ. श्री संजय हिंगमिरे, श्री गणेश हिंगमिरे, श्री गुरुनाथ कचरे आणि श्री सुनील महाजन यांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांचा सत्कार श्री स्वामी समर्थ डेंटल हॉस्पिटलचे संस्थापक श्री स्वामी सर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
या मंगलप्रसंगी लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित सर्व नागरिकांनी आणि मान्यवरांनी श्री स्वामी सर व त्यांच्या संपूर्ण टीमला नवीन हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि रुग्णसेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी हॉस्पिटल प्रशासनातर्फे उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.
Comments
Post a Comment