आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलिसांचा रूट मार्च आणि इंदोलीत 'जातीय दंगा काबू' योजनेची रंगीत तालीम.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलिसांचा रूट मार्च आणि इंदोलीत 'जातीय दंगा काबू' योजनेची रंगीत तालीम.
उंब्रज दि 10 :- रवी वाकडे
आगामी दुर्गादेवी उत्सव तसेच इतर सण-उत्सवांच्या काळात उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दिनांक ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:३५ ते ०२:४५ या वेळेत मौजे उंब्रज येथे रूट मार्च (संचलन) काढण्यात आला, तर मौजे इंदोली येथे 'जातीय दंगा काबू योजना' रंगीत तालीम (मॉक ड्रिल) यशस्वीरित्या पार पडली.
उंब्रज येथील माणिक चौक, धनलक्ष्मी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, घुटे दुकान, पाटण तिकाटने, अंधारवाडी रोड आणि चोरे रोड या प्रमुख मार्गांवरून हा रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि सलोख्याचे वातावरण राहावे हा यामागील मुख्य उद्देश होता.
पोलीस बळ आणि साहित्याचा वापर:
या रूट मार्च आणि रंगीत तालीम मोहिमेमध्ये उंब्रज पोलीस स्टेशनचे २ पोलीस अधिकारी, १४ पोलीस अंमलदार, ४ होमगार्ड आणि आर.सी.पी. (RCP) प्लॅटूनचे ६ जवान सहभागी झाले होते. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी गॅस गन, लाठी, हेल्मेट, ढाली या दंगल नियंत्रण साहित्यासह २ सरकारी वाहनांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.
हा रूट मार्च आणि रंगीत तालीम सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
Comments
Post a Comment