ग्रामरोजगार सहाय्यक संघटना, कराड तालुका जिल्हा सातारा यांच्या वतीने खालील प्रलंबित मागण्या आणि, काम बंद आंदोलना बाबत निवेदन.
ग्रामरोजगार सहाय्यक संघटना, कराड तालुका जिल्हा सातारा यांच्या वतीने खालील प्रलंबित मागण्या आणि, काम बंद आंदोलना बाबत निवेदन.
सातारा दि 05 :- रवी वाकडे
ग्रामरोजगार सहाय्यक संघटना, कराड तालुका जिल्हा सातारा यांच्या वतीने खालील प्रलंबित मागण्या बाबत, काम बंद आंदोलनाबाबत सोमवार दि.५ रोजी मा.गटविकास अधिकारी सो.पंचायत समिती कराड व मा.तहसिलदार सो.कराड यांना निवेदन देण्यात आले.
आमच्या प्रमुख मागण्या :
३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. ग्राम रोजगार सहायक यांचे २४ महिन्याचे थकित मानधन वैयक्तिक बँक खात्यावर जमा करावे.
शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना लागू होणारे मानधन व इतर लाभ कोणतीही दिरंगाई न करता देण्यात यावेत.
सर्व थकीत मानधन तातडीने द्यावे.
ग्रामरोजगार सहाय्यकांचे प्रलंबित मानधन तातडीने त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात यावे. यापुढे मानधन प्रत्येक महिन्याला नियमितपणे देण्याची व्यवस्था करावी.
प्रवास भत्ता द्यावा.
शासकीय कामासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व इतर कार्यालयांमध्ये करावा लागणारा प्रवास लक्षात घेऊन नियमानुसार प्रवास भत्ता देण्यात यावा.
विमा संरक्षण द्यावे.
गावपातळीवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांना अपघाती विमा व आवश्यक विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे. ग्रामसभेच्या निर्णयावरून थेट सेवा समाप्तीची पद्धत बंद करण्यात यावी. ग्रामरोजगार सहायकांना अर्धवेळ स्वरूपाचे न ठेवता पूर्ण वेळ करण्यात यावे. “एक ग्रामपंचायत – एक ग्रामरोजगार सहाय्यक” लागू करावे.
एका ग्रामरोजगार सहाय्यकावर अनेक ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार देऊ नये. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामरोजगार सहाय्यकाची नियुक्ती करण्यात यावी.
कामाच्या वाढत्या व्यापाचा विचार करून आवश्यक सुविधा द्याव्यात.
ऑनलाइन कामकाज, इंटरनेट, संगणक व इतर प्रशासकीय कामांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या प्रमुख मागण्या बाबत काम बंद आंदोलन निवेदन देण्यासाठी कराड तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष श्री.सोमनाथ थोरात, उपाध्यक्ष श्री.प्रताप भणगे कराड दक्षिण, श्री.सुभाष वाघमारे कराड उत्तर , सचीव श्री.सुधीर दिक्षीत, खजिनदार श्री.रामचंद्र शेवाळे, मार्गदर्शक व सल्लागार श्री.जयवंत माने , संघटक श्री.सुरेश शेवाळे. सौ.साक्षी आकाश इंगवले , सल्लागार श्री.निलेश पाटील श्री.निवास खंडागळे सौ.रोहिणी पिसाळ श्री. रविंद्र तोडकर श्री.शहानवाज मुल्ला तसेच कार्यकारणी संचालक मंडळ श्री.विकास घोलप निवृत्ती तडाके श्री.तानाजी सावंत श्री.रामचंद्र शेवाळे श्री.सोमनाथ मोहिते श्री.सागर जाधव श्री.सुरज काटकर श्री.लालासाहेब शिंदे श्री.राजू सावंत तसेच कराड तालुक्यातील बहुसंख्य ग्राम रोजगार सहाय्यक, श्री. ऋषिकेश पाटील,सौ.जयश्री सूर्यवंशी, श्री.सत्यवान साळुंखे, श्री.दादासो पवार श्री.सुहास कुराडे, श्री.लालासो वाडकर श्री.आप्पासो आवळे, सौ. प्राजक्ता वांगडे,श्री. अनिल ठावरे, श्री.सागर शेवाळे,श्री.गणेश भिसे श्री.बजरंग कोकाटे, श्री.कृष्णात मोरे,श्री. लालासो शिंदे, श्री.विशाल साठे, श्री.राजेंद्र सावंत , श्री.विकास घोलप,श्री. अमोल येलमारे कराड तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटना ता. कराड जि. सातारा उपस्थित होते.
Comments
Post a Comment