कृष्णा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; उंब्रज पोलिसांचे ओळख पटवण्याचे आवाहन.
उंब्रज दि 31:- रवी वाकडे
येथील महादेव मंदिराजवळील कृष्णा नदीच्या पात्रात एका ३० ते ४० वयोगटातील अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला आहे. शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर २०२६) सकाळी ८:०० वाजण्याच्या पूर्वी ही घटना उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र बाळासो शिंदे (वय ५९, रा. उंब्रज बाजारपेठ, ता. कराड) यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मृत व्यक्तीच्या अंगात निळ्या रंगाचा चौकडी (चेक्स) फुल शर्ट आणि काळ्या रंगाची नाईट पॅन्ट आहे. नदीपात्रात पाण्यात बुडून या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा केला असून शवविच्छेदनाची (पोस्टमॉर्टम) तजवीज करण्यात आली आहे. उंब्रज पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलीस हवादार पवार यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक (PSI) गवळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पोलीस आवाहन:
सदर वर्णनाची कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या मृतदेहाबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने उंब्रज पोलीस ठाण्याशी किंवा खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे:
सदर वर्णनाची कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या मृतदेहाबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने उंब्रज पोलीस ठाण्याशी किंवा खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे:
- तपास अधिकारी (PSI गवळी): 7776949548
- पोलीस हवादार पवार: 9763721734
Comments
Post a Comment