सातारा जिल्ह्याच्या श्रद्धा इंगळेची सुवर्ण कामगिरी; ७० व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड !

सातारा जिल्ह्याच्या श्रद्धा इंगळेची सुवर्ण कामगिरी; ७० व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड !
कराड दि 29 :- रवी वाकडे
मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील श्रद्धा प्रशांत इंगळे हिने उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीच्या जोरावर सागर (मध्य प्रदेश) येथे आयोजित होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात तिची निवड झाली आहे. 
श्रद्धाच्या या दैदिप्यमान यशामुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
श्रद्धाला हे यश मिळवून देण्यात तिचे वडील प्रशांत इंगळे व आई सौ. रोहिणी प्रशांत इंगळे यांचे खंबीर पाठबळ लाभले. 
तसेच तिचे प्रशिक्षक निलेश फणसळकर व ओंकार पालकर यांच्या 
यासोबतच तिला होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन, प्राचार्य आणि कर्मचारी वर्ग या सर्वांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. 
 विद्यार्थी आणि विश्वजित देशमुख यांचेही तिला अनमोल सहकार्य लाभले.
तिच्या या घवघवीत यशामुळे आणि राष्ट्रीय स्तरावर झालेल्या निवडीबद्दल हिंगणोळे ग्रामस्थ तसेच 'कराड शटलर्स अकॅडमी, कराड' यांच्या वतीने तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. आगामी ७० व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेतही श्रद्धा अशीच चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments