शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचा तोंडोलीत हळदीकुंकू आणि फराळ वाटप उपक्रम.
कराड दि 20:- संकेत महाजन
शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचा तोंडोलीत हळदीकुंकू आणि फराळ वाटप उपक्रम
तोंडोली येथे शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने महिलांसाठी विशेष हळदीकुंकू आणि फराळ वाटप कार्यक्रमाचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर महिलांच्या सुवासिनी परंपरेचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी संस्थेने हा कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाला तोंडोली परिसरातील महिलांनी अतिशय उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या महिलांमुळे संपूर्ण कार्यक्रमस्थळ मंगलमय आणि भक्तीमय वातावरणाने प्रफुल्लित झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिशक्तीच्या नामघोषाने आणि देवीच्या पूजनाने झाली. हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेच्या मार्गदर्शक व विश्वस्त सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.शोभा खलिपे आणि सदस्या सौ.पूजा खलिपे यांनी अत्यंत नेटकेपणाने व उत्साहात संपन्न केला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा.अमरदीप खलिपे आणि सचिव मा. श्रीकांत खलिपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी सौ. उषा खलिपे, सौ. सुमन खलिपे, सौ. सुनीता कचरे, सौ. विजया राजमाने, सौ. स्नेहा मोहिते, सौ. रूपाली मोहिते, सौ. सविता मोहिते, सौ. मंजू मोहिते, सौ. सुवर्णा शिवरकर, सौ. कोमल मोहिते, सौ. कविता काटकर, श्रीम. शोभा बाबर, श्रीम. मालन मोहिते, श्रीम. जयश्री मोहिते, श्रीम. इंदुताई मोहिते आणि श्रीम. भागीरथी मोहिते या सर्व महिलांच्या उपस्थितीत व सक्रिय सहभागाने हळदीकुंकवाचा कार्यक्रम आणि विशेष फराळ वाटप अत्यंत उत्साहात पार पडले.
नवरात्रीच्या या मंगलमयी दिवसांत महिलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी अशा अनोख्या आनंदाचा सोहळा आयोजित केल्याबद्दल सर्व महिलांमधून शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष कौतुक आणि आभार मानले जात आहेत. सौ. शोभा खलिपे आणि सौ. पूजा खलिपे यांनी संपन्न केलेला हा संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि मांगल्याच्या वातावरणात पार पडला असून, या निमित्ताने महिलांमध्ये एकतेची आणि उत्साहाची एक नवी ऊर्जा पाहायला मिळाली.
Comments
Post a Comment