महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे - आमदार मनोजदादा घोरपडे,रहिमतपूर येथील चौंडेश्वरी शिक्षण संस्थेत स्मिताताई जाधव यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद


महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे - आमदार मनोजदादा घोरपडे,रहिमतपूर येथील चौंडेश्वरी शिक्षण संस्थेत स्मिताताई जाधव यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा दि 18 :- रवी वाकडे
महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे - आमदार मनोजदादा घोरपडे,रहिमतपूर येथील चौंडेश्वरी शिक्षण संस्थेत स्मिताताई जाधव यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार *सौ. स्मिताताई जाधव* यांच्या प्रचारार्थ रहिमतपूर येथील *चौंडेश्वरी शिक्षण संस्थेत* भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कराड उत्तरचे आमदार *मा. मनोजदादा घोरपडे* यांनी पदवीधरमधून स्मिताताई जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून *कौस्तुभ गावडे* यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

या सभेला आमदार *धैर्यशीलदादा कदम*, चौंडेश्वरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा *सौ. चित्रलेखा माने-कदम ताई*, *जितेंद्रदादा पवार, नंदकुमार माने, अरुण माने, निलेश माने, रणजित माने* यांची प्रमुख उपस्थिती होती         यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, "पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई जाधव या उच्चशिक्षित असून डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले आहे. पुढारी परिवाराच्या माध्यमातून त्यांना सामाजिक कामाचा मोठा वारसा आहे. पदवीधरांचे प्रश्न त्या अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतील. एक उच्चशिक्षित, अभ्यासू आमदार विधान परिषदेत पाठवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे."

"त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना शिक्षण क्षेत्रातील मोठा अनुभव असून ते शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निश्चितच सोडवतील. या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे," असे आवाहन त्यांनी केले.या प्रचार सभेला नाना राऊत सर, किरण भोसले, तुषार चव्हाण, सतीश भोसले, मयुरेश माने, सुरज गायकवाड, विजय लोहार, अभय शेरकर, विक्रम माने, अशोक माने, विकास माने, शेखर पाटील, प्रल्हाद शेरकर, विजय माने, दिलीप पवार, पी.एम. चव्हाण, सुभाष माने, किरण माने, शंकर भोसले, राजू नलवडे, राजू रोकडे, योगेश चव्हाण, सोमनाथ वाघ, जगदीश गायकवाड, प्रवीण कोरे, अमर शेडगे, पारस चहा, वैभव चव्हाण, लिंबाजी सावंत, प्रशांत भोसले, अभय भोसले यांच्यासह शिक्षक व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments