तळबीड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! खोपोलीतील गुन्ह्यातील ३ आरोपी पांढऱ्या रंगाच्या वेरना कारसह तासवडे टोल नाक्यावर जेरबंद.


तळबीड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! खोपोलीतील गुन्ह्यातील ३ आरोपी पांढऱ्या रंगाच्या वेरना कारसह तासवडे टोल नाक्यावर जेरबंद.
कराड दि 30 :- रवी वाकडे
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे गुन्हा करून कराडच्या दिशेने पळून येणाऱ्या तीन आरोपींना तळबीड पोलिसांनी तासवडे टोल नाका येथे सापळा रचून पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई वेरना कारसह ताब्यात घेतले आहे. तळबीड पोलिसांच्या या तत्पर आणि अचूक कारवाईमुळे परजिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
गोपनीय माहितीवरून रचला सापळा
रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३८४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल असलेले आरोपी पांढऱ्या रंगाच्या वेरना कारमधून कराडच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती तळबीड पोलीस ठाण्याला मिळाली होती. माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून तळबीड पोलिसांनी तात्काळ हालचाली करत तासवडे टोल नाक्यावर तटबंदी करत सापळा रचला.

काही वेळातच माहिती मिळालेली संशयित पांढऱ्या रंगाची ह्युंदाई वेरना कार टोल नाक्यावर आली असता, पोलिसांनी ती अडवून कारमधील तीनही आरोपींना वाहनासह ताब्यात घेतले. परजिल्ह्यातील गुन्ह्याची माहिती मिळताच इतर यंत्रणांशी तातडीने समन्वय साधून तळबीड पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे:
१) निशांत बंडू पाटील (वय ३५, रा. खराळे, पोस्ट काळुंद्रे, ता. शिराळा, जि. सांगली)
२) अमर जयसिंग पाटील (वय ३६, रा. नांदगाव, ता. कराड, जि. सातारा)
३) संग्राम शिवाजी पाटील (वय ३३, रा. काले, ता. कराड, जि. सातारा)
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
सदरची यशस्वी कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली काडुकर, तसेच कराड उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र भोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पीएसआय (PSI) सुभाष फडतरे, हेड कॉन्स्टेबल (HC) राघू खाडे, योगेश भोसले, सचिन गुरव, तसेच पोलीस कॉन्स्टेबल (PC) अभय मोरे, प्रवीण गायकवाड आणि संजय मासाळ यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments