लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कराड यांच्या वतीने कराड तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांसाठी ‘सह्याद्री नवदुर्गा पुरस्कार २०२६’चे आयोजन.


लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कराड यांच्या वतीने कराड तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांसाठी ‘सह्याद्री नवदुर्गा पुरस्कार २०२६’चे आयोजन.
कराड दि 06 :- रवी वाकडे
 लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कराड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी ‘सह्याद्री नवदुर्गा पुरस्कार २०२६’ या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. अशी माहिती कराड तालुका पंचायत समिती सदस्य संग्रामबाबा पवार यांनी दिली 

कराड तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी, उद्योग, कला, क्रीडा, महिला सक्षमीकरण तसेच इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘सह्याद्री नवदुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी इच्छुक महिलांनी आपल्या कार्याची माहिती तसेच केलेल्या उल्लेखनीय कामाचा छोटासा व्हिडिओ किंवा लेखी माहिती ९९६०४४७०७१ या क्रमांकावरकरावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नामांकनाची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२६ व पुरस्कार वितरण नोव्हेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे 

या उपक्रमातून कराड तालुक्यातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना व्यासपीठ मिळणार असून, त्यांच्या कार्याचा समाजासमोर गौरव करण्यात येणार आहे.

कराड तालुक्यातील अधिकाधिक कर्तृत्ववान महिलांनी या पुरस्कारासाठी नामांकन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
’

Comments