उंब्रज बाजारपेठ अतिक्रमणांच्या विळख्यात; शासकीय जागेवर 'शेड' उभारून चाललीये बेधडक भाडेवसुली!ग्रामपंचायतीच्या 'अंधाधुंद' कारभारावर ग्रामस्थांमधून तीव्र संताप; वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का ?
उंब्रज बाजारपेठ अतिक्रमणांच्या विळख्यात; शासकीय जागेवर 'शेड' उभारून चाललीये बेधडक भाडेवसुली!
ग्रामपंचायतीच्या 'अंधाधुंद' कारभारावर ग्रामस्थांमधून तीव्र संताप; वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का ?
उंब्रज दि 11:- विशेष प्रतिनिधी
उंब्रज बाजारपेठ अतिक्रमणांच्या विळख्यात; शासकीय जागेवर 'शेड' उभारून चाललीये बेधडक भाडेवसुली!
ग्रामपंचायतीच्या 'अंधाधुंद' कारभारावर ग्रामस्थांमधून तीव्र संताप; वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?
कराड तालुक्यातील एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंब्रज बाजारपेठेला सध्या अतिक्रमणाचा मोठा कर्करोग जडला आहे. बाजारपेठेतील अत्यंत मोक्याच्या आणि मौल्यवान शासकीय जमिनींवर भूमाफियांनी बेकायदेशीरपणे पक्की शेड उभारली असून, या शेडच्या माध्यमातून दरमहा हजारो रुपयांची बेधडक भाडेवसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणाकडे उंब्रज ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली असून, ग्रामपंचायतीच्या या अंधाधुंद आणि ढिसाळ कारभारामुळे शासकीय महसुलाचे मोठे नुकसान होत आहे.
तर काहींनी या ठिकाणी पक्क्या शेड्स उभारून जागा बळकावली!
मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज बाजारपेठेतील शासकीय भूखंडावर काही हितसंबंधी लोकांनी सुमारे १0 बाय 20 फुटांचे शेड उभे केले आहेत. या बेकायदेशीर शेडमध्ये हॉटेल, चहा टपऱ्या, वडापाव सेंटर्स, मिठाई आणि फळ विक्रीचे दुकाने थाटून शासकीय जागा पूर्णपणे बळकावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही जागा सरकारी असतानाही काही ठराविक व्यक्ती या दुकानदारांकडून दरमहा हजारो रुपयांचे भाडे वसूल करत आहेत. शासकीय जागेचा वापर करून खाजगी खिशात चाललेली ही भाडेवसुली कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
अनाधिकृत टपऱ्या आणि शेड टाकून वेढला गेला आहे. एवढेच नव्हे तर, या बेकायदेशीर शेड्समध्ये बेकायदेशीर पणे
अध्येध धंदे राजरोस पणे सुरू आहेत माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सार्वजनिक मालमत्तेची अशी उघड लूट सुरू असताना स्थानिक प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत बसले आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार 'अंधाधुंद'; मोजणीतही गोलमाल?
उंब्रज ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे गावातील मोकळे रस्ते आणि सरकारी जमिनी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. काही दिवसांपूर्वी शासकीय जागे मधील अतिक्रमणा ची माहिती देण्या बाबत bdo यांनी सूचना दिल्या होत्या, मात्र ज्या गटांमध्ये मोठे अतिक्रमण झाले आहे, ते महत्त्वाचे गट क्रमांक मोजणी प्रक्रियेतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. केवळ कमी अतिक्रमण असलेल्या भागांचीच मोजणी करून मूळ 'बड्या' अतिक्रमणांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून होत असल्याचा गंभीर आरोप आता होऊ लागला आहे.
वरिष्ठ प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा!
बाजारपेठेतील अतिक्रमणाच्या या विळख्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बनली असून सामान्य ग्राहकांना चालणेही मुश्कील झाले आहे. ग्रामपंचायतीच्या या मनमानी व अंधाधुंद कारभाराची चौकशी करून, शासकीय जागेवरील बेकायदेशीर शेड्स तात्काळ जमीनदोस्त करण्यात याव्यात आणि सरकारी जागेवर बेकायदेशीर भाडे लाटणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी उंब्रजमधील सजग नागरिकांकडून होत आहे. आता सातारा जिल्हाधिकारी आणि पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment