मंगलताई भिमराव घोरपडे यांना 'आदर्श माता' पुरस्काराने सन्मानित,प्रतापगडावर शिवगर्जना - शूरवीर जिवाजी महाले जयंती उत्साहात.
मंगलताई भिमराव घोरपडे यांना 'आदर्श माता' पुरस्काराने सन्मानित,
प्रतापगडावर शिवगर्जना - शूरवीर जिवाजी महाले जयंती उत्साहात.
सातारा दि 10 :- रवी वाकडे
शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती, किल्ले प्रतापगड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही जिवाजी महाले यांची जयंती प्रतापगडावर मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्यात *सन २०२६ चा मानाचा 'आदर्श माता' पुरस्कार श्रीमती मंगलताई भिमराव घोरपडे यांना* प्रदान करण्यात आला.
कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे तसेच युवा उद्योजक संग्राम घोरपडे यांच्या मातोश्री असलेल्या मंगलताई घोरपडे यांनी सामाजिक कार्यात दिलेले योगदान, एक सुसंस्कृत आणि आदर्श कुटुंब घडवण्यात पार पाडलेली महत्त्वाची भूमिका आणि त्यांच्या ठायी असलेले मातृत्वाचे संस्कार याचा गौरव म्हणून समितीच्या वतीने हा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
*मान्यवरांची उपस्थिती*
या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी कराड उत्तरचे आमदार *मनोजदादा घोरपडे* मदनभाऊ काळभोर उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष *अधिकराव चव्हाण*, सचिव *शंकरराव गायकवाड*, शिवाजी खामकर, विजय काशीद, जगन्नाथ पवार, विष्णू संकपाळ, प्रदीप माने, दाजी सुर्वे, अमोल काशीद, पांडुरंग चव्हाण, प्रताप भोसले, डी. के. चव्हाण, यांच्यासह नाभिक समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शूरवीर जिवाजी महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. त्यांच्या शौर्याची आणि निष्ठेची आठवण म्हणून दरवर्षी किल्ले प्रतापगडावर या जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या सोहळ्यात आदर्श माता पुरस्काराने या उत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
एक आदर्श गृहिणी व सुसंस्कृत समाजकार्याचा वसा घेणारे कुटुंब घडवणाऱ्या आणि समाजकारणात भरीव योगदान देणाऱ्या मंगलताई घोरपडे यांचा हा सन्मान संपूर्ण कराड उत्तर वासियांसाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment