कराड तालुक्याचा दुष्काळयादीत समावेश करा आमदार मनोजदादा घोरपडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी,कराड न्यायालयाच्या नव्या जागेसाठीही मागणी .
कराड तालुक्याचा दुष्काळयादीत समावेश करा आमदार मनोजदादा घोरपडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी,कराड न्यायालयाच्या नव्या जागेसाठीही मागणी .
कराड दि 07 :- रवी वाकडे
कराड तालुक्याचा दुष्काळयादीत समावेश करा आमदार मनोजदादा घोरपडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी,कराड न्यायालयाच्या नव्या जागेसाठीही मागणी .
कराड तालुक्यात पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिके वाळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर *कराड तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा,* अशी आग्रही मागणी *कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे* यांनी राज्याचे मुख्यमंत्री *ना. देवेंद्र फडणवीस* यांच्याकडे केली आहे.
आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री ना. फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी निवेदनासोबत कराडचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला दुष्काळी परिस्थितीचा अधिकृत अहवाल तसेच पावसातील खंडाची आकडेवारी जोडली.
निवेदनात आमदार घोरपडे यांनी म्हटले आहे की, यंदा कराड तालुक्यात सोयाबीन आणि भुईमूगाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत पावसाने दीर्घकाळ दडी मारली. परिणामी पिकांची वाढ खुंटली असून 'ड्राय स्पेल' मुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कराड तालुक्याचा दुष्काळयादीत समावेश करून बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी.
या मागणीची मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून पीक कापणी प्रयोगांच्या आधारे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
*कराड न्यायालयाच्या नव्या जागेसाठीही पाठपुरावा*
दरम्यान, याच भेटीदरम्यान कराड वकील संघटनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कराड न्यायालयासाठी नवीन जागा व प्रशस्त न्यायालयीन संकुल उभारण्याच्या मागणीसाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन अॅड. पारिजात पांडे, कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दीपक थोरात, अॅड. विशाल शेजवळ, अॅड. स्वप्नील करांडे, अॅड. दीपक माळी, अॅड. विजय पाटील, अॅड. सिद्धीराज पाटील, अॅड. अशोक पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment