माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास काटवटे यांच्यावर जीवघेणा हल्ला; संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई ची मागणी .
माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास काटवटे यांच्यावर जीवघेणा हल्ला; संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई ची मागणी .
कराड दि 05 :- रवी वाकडे
माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्याचा राग मनात धरून माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास काटवटे यांच्यावर ग्रामसेवक, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जातीवाचक अर्वाच्य शिवीगाळ करून वरील सर्वांनी मिळून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उंब्रज येथे घडली आहे. या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन ८ दिवस उलटले तरीही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माहिती देण्याऐवजी बेदम मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, रामदास काटवटे यांनी ग्रामसेवक समाधान माने यांच्याकडे उंब्रज माहितीच्या अधिकाराखाली काही अधिकृत माहिती मागितली होती. मात्र, ही माहिती देण्यास ग्रामसेवकाकडून वारंवार टाळाटाळ केली जात आहे . तसेच या बाबतीत पंचायत समिती कराड ,जिल्हा परिषद सातारा, विभागीय आयुक्त पुणे गटविकास अधिकारी प्रताप पाटील,सहाय्यक गटविकास अधिकारी शैलेश पाटील, विस्तार अधिकारी विकास स्वामी,
उंब्रज ग्रामपंचायत ग्रामसेवक समाधान माने,यांच्या कडे मी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि फोन च्या माध्यमातून उंब्रज ग्राम पंचायत मध्ये चालू असणाऱ्या भ्रष्ट कारभारात बाबतीत माहिती च्या अधिकारा खाली माहिती मागवली आहे मात्र आज पर्यंत मला माहिती दिली गेली नाही उलट ही माहिती देण्यासाठी मला वेळोवेळी टोलवाटोलवी केली गेली वरिष्ठ अधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांना सदर माहिती देण्यासाठी सांगून ही माहिती दिली जात नाही त्या मूळ मी या बाबत ग्रामसेवक यांना माहिती च्या मागणी संदर्भात गेले असता, ग्रामसेवक समाधान माने, माजी सरपंच योगराज आणि ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार जाधव यांनी संगनमत करून रामदास काटवटे यांना बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
या खुनी हल्ल्याबाबत पीडित रामदास काटवटे यांनी तातडीने उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार देऊन ८ दिवस झाले तरी आजअखेर पोलिसांनी आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.संबंधित अधिकारी यांना या साठी राजकिय पाठिंबा असलेमूळ यांच्या वर कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे ,त्याच बरोबर सदरची घटना घडली त्या ठिकाणचे cctc फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न ग्रामसेवक आनि माजी सरपंच यांनी केला आहे तरी
संबंधित आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी पीडित काटवटे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment