कराड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; पंचायत समिती सदस्य संग्रामबाबा पवार यांचे तहसीलदारांना निवेदन.
कराड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; पंचायत समिती सदस्य संग्रामबाबा पवार यांचे तहसीलदारांना निवेदन.
कराड, दि. 01 : रवी वाकडे
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये कराड तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. तालुक्यातील अपुरा पाऊस, पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि आगामी काळातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता कराड तालुक्याचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, या मागणीसाठी कराडचे तहसीलदार यांना जाहीर निवेदन देण्यात आले.
या वर्षी कराड तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असून, त्याला शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती आणि मदतीचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कराड तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हे निवेदन देतेवेळी कराड पंचायत समितीचे सदस्य संग्रामबाबा अधिकराव पवार, अॅड. समीर देसाई, बापूराव साळुंखे, सचिन संपतराव पाटील, बाबासाहेब विठ्ठल माने, विश्वनाथ आप्पासो शिंदे, सागर विलास शिंदे, गणेश थोरात, कैलास पिसाळ, महेश यशवंत काशीद, धनपाल शंकर फुके, तुषार प्रकाश शिंदे, ह.भ.प. शिवाजीराव पाटील, अमृत हिंदुराव जाधव, सौ. लक्ष्मी दत्तात्रय थोरात (शामगाव), शिवाजीनगरचे सरपंच सचिन उत्तम पवार, सदस्य विक्रम वसंत साळुंखे, आणि संदीप गुरुदेव पवार यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment