मौजे हिंगणोळे येथे ST Pickup शेड उभारणीची मागणी.
उंब्रज दि 04 :- रवी वाकडे
मौजे हिंगणोळे येथे ST Pickup शेड उभारणीची मागणी, हिंगणोळे येथील नागरिक व विद्यार्थी यांना एस.टी. बसची प्रतीक्षा करताना उन्हाळा, पावसाळा व इतर प्रतिकूल हवामानाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत सातारा जिल्हा परिषद सदस्य मा. मदनभाऊ काळभोर यांच्याकडे ST Pickup शेड उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी मा. राकेशराज थोरात पाटील (भारतीय जनता पार्टी, कराड उत्तर, उंब्रज मंडल) यांनी हिंगणोळे गावातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लवकरात लवकर ST Pickup शेड उभारण्यात यावे, अशी मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मा. मदनभाऊ काळभोर यांनी संबंधित विभागाशी पाठपुरावा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी गावातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. हिंगणोळे गावातील नागरिकांनी या मागणीचे स्वागत करत ST Pickup शेडचे काम लवकरात लवकर मंजूर करून प्रत्यक्षात सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Comments
Post a Comment