नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन सेवा आता उंब्रजमध्ये - आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते RTO कॅम्पचे दिमाखात उद्घाटन.


नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन सेवा आता उंब्रजमध्ये - आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते RTO कॅम्पचे दिमाखात उद्घाटन.
उंब्रज, दि. १५ सप्टेंबर : रवी वाकडे
उंब्रज व परिसरातील नागरिकांना परिवहन विभागाच्या विविध सेवा अधिक सुलभ, जलद आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या *उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कराडच्या कॅम्पचे* उद्घाटन कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार *मा. मनोजदादा घोरपडे* यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

उंब्रज हे कराड तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असून, परिसरातील नागरिकांना परिवहन विभागाशी संबंधित कामांसाठी कराडला ये-जा करावी लागत होती. नागरिकांचा वेळ, पैसा आणि त्रास वाचावा यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून हा कॅम्प उंब्रजमध्ये सुरू करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी *मा. विजय इंगवले* जिल्हा परिषद सदस्य *रणजित जाधव, मदनभाऊ काळभोर, पंचायत समिती सदस्य धैर्यशील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार (उंब्रज पोलीस स्टेशन), मोटार वाहन निरीक्षक स्वप्नील कदम, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रजनी पाटोळे* यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिकांच्या दारी परिवहन सेवा

या कॅम्पमुळे उंब्रजसह परिसरातील नागरिकांना परिवहन विभागाच्या उपलब्ध सेवांचा स्थानिक पातळीवरच लाभ घेता येणार आहे. यामुळे कार्यालयातील अनावश्यक गर्दी कमी होऊन नागरिकांना पारदर्शक व जलद सेवा मिळणार आहे.

यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले की, उंब्रजला शहर म्हणून विकसित करण्याचा आपला मानस असून नागरिकांना सर्व शासकीय सेवा एका छताखाली मिळाव्यात यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. या कॅम्पच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती या कॅम्पच्या माध्यमातून परिवहन सेवांसोबतच रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, वाहनांची योग्य स्थिती आणि अपघात प्रतिबंध याबाबत जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. वाहनधारकांनी कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले.

हा कॅम्प मा. विजय इंगवले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी *सुरेशतात्या पाटील, मोहनबापू माने, उमेश साळुंखे, अजित जाधव, उपसरपंच विजय जाधव, विनायक जाधव, निखिल संकपाळ, रणजीत पाटील, विकास जाधव, जीवन जाधव, नाना दिगंबर भिसे पाटील, अमोल पाटील, जालिंदर पाटील* यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी व उंब्रज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments