हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये 'हुतात्मा दिन ' संप्पन्न. वडूज शिक्षण विकास मंडळ तर्फे अभिवादन.
हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये 'हुतात्मा दिन ' संप्पन्न. वडूज शिक्षण विकास मंडळ तर्फे अभिवादन.
सातारा, दि.11-प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज तर्फे दि.9 सप्टेंबर ,हुतात्मा दिनाचे औचित्य साधून , म.गांधी यांनी सुरू केलेल्या इंग्रज विरोधी सन 1942 च्या ' चले जाव ' चळवळीची प्रेरणा घेवून, वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे हुतात्मा झालेल्या नऊ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा शाळा संकुलातील हुतात्मा परशुराम श्रीपती घार्गे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.या नंतर त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक सुशोभित गाडीचे पूजन करून वाद्य वृंदा सह विद्यार्थी फेरी द्वारे काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात , 'हुतात्मा परशुराम घार्गे की जय ', 'नऊ हुतात्मे अमर रहे ', 'भारत माता की जय ', ' वंदे मातरम् ' या घोषणा दिल्या.हुतात्मा चौकात सर्व हुतात्म्यांच्या नावाचा जयघोष करत ' स्मृती चबुतऱ्याला अभिवादन करण्यात आले.या वेळी श्री.राजेंद्र जगदाळे सर यांनी नऊ हुतात्म्यांच्या बलिदानाचा जयघोष करणाऱ्या घोषणा दिल्या व वाद्य वृंदा तर्फे संगीतमय सलामी देण्यात आली. पुढे हुतात्मा स्मारक मधील दिप स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात येवून,तेथील पुतळ्याचे पूजन करण्यात आले. फेरी शाळा संकुलात येवून,हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास सुरुवात झाली. सुरुवातीला चेअरमन गोविंद भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले. सांस्कृतिक गीत मंचात श्री.संतोष स्वामी, अक्षय कुमार जाधव,सौ. निता पंडीत,राधिका डोंबे मॅडम यांच्या सह विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक रूपाने श्री.डी.एम.लहारे सर यांनी करून कार्यक्रमाचा उद्देश कथन केला.या नंतर प्रा. ए. व्ही.शेटे यांनी 'वडूजच्या महा संग्रामाची ' माहिती कथन केली.
श्री.एस. डी. घनवट सर यांनी विविध प्रकारच्या स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय गुणवत्ता प्राप्त क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचा मानाचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ यथोचित गुण गौरव संस्था संचालक यांच्या हस्ते करण्यात आला.पालक संघाचे अध्यक्ष डॉ.सचिन पवार यांनी संस्था व शाळा मिळून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी जे सक्षम पणे कार्य करत आहे.याबद्दल समाधान व्यक्त करत कौतुक केले.सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळा ,शिक्षक व पालक यांच्या बद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा बहारदार पोवाडा सादर केला.
संचालक ज्ञानेश्वर पंडीत सर यांनी स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण कायम रहावे वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, म.फुले प्राथमिक शाळा व प्रेरणा पूर्व प्राथमिक शिक्षण केंद्र हे विद्यादानाचे एक जिवंत स्मारक म्हणून कसे कार्य करत आहे.याची माहिती दिली.तहसील कार्यालय व नगरपंचायत , वडूज यांच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी अनेक अधिकारी ,पदाधिकारी व स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी हजर होते.
कार्यक्रमाचे सर्व फोटो सेशन व चित्रीकरण अक्षय जाधव सर यांनी केले.वरिष्ठ शिक्षक श्री.एस.एस.जामदार यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष विजय म्हामणे, शाळा समिती अध्यक्ष संतोष कांबळे, संचालक सुभाष येवले,सतीश शेटे,अशोक भंडारे,गजानन शेटे, प्रशांत शेटे, नितिन जाधव,शैलेश देशपांडे,रविराज काळे,श्री.एम. एस .गोडसे सर,प्राचार्या सौ. बी.एस.माने मॅडम,उप प्राचार्या सौ.एस.पी.जोशी मॅडम,पर्यवेक्षक ए.एम.राऊत, व्ही.टी.पवार,प्रा.आर. बी. येलमर,
मुख्याध्यापिका सौ.एस.जी.शिंदे मॅडम हजर होत्या. सर्व शिक्षक - शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, स्त्री - पुरुष पालक वर्ग,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर हजर होते.



Comments
Post a Comment