बालगृहातील निशांत शिलवंत मृत्यू प्रकरण: दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी वडगाव ग्रामस्थ एकवटले.


बालगृहातील निशांत शिलवंत मृत्यू प्रकरण: दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी वडगाव ग्रामस्थ एकवटले.
उंब्रज दि :- प्रतिनिधी
वडगाव (ता. कराड) येथील निशांत नितीन शिलवंत (वय १४) या बालकाच्या मृत्यूप्रकरणी प्रशासकीय निष्काळजीपणा आणि मारहाणीचे गंभीर आरोप कुटुंबीयांनी केले आहेत. निशांत हा कराड येथील क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृहात वास्तव्यास होता.कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, २७ ऑगस्ट रोजी त्याला बालगृहात मारहाण करण्यात आली होती, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतरच्या उपचारादरम्यान कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात ११ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत निशांतच्या मात्याने बालगृह व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाविरोधात कराड पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईक व वडगाव ग्रामस्थांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास दोन दिवसांत कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला

Comments