४८० कोटींच्या मल्हारपेठ-मायणी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार! मल्हारपेठ-मायणी रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा! उद्घाटनापूर्वीच सिमेंट रस्त्याला भेगा; ठेकेदार-अधिकारी यांचे संगनमत ,?
४८० कोटींच्या मल्हारपेठ-मायणी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार! मल्हारपेठ-मायनी रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा! उद्घाटनापूर्वीच सिमेंट रस्त्याला भेगा; ठेकेदार-अधिकारी यांचे संगनमत ,?
उंब्रज दि १८ :- रवी वाकडे
४८० कोटींच्या मल्हारपेठ-मायणी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार ! प्रत्यक्ष पाहणीत उद्घाटनापूर्वीच सिमेंट रस्त्याला भेगा; अतिशय खराब प्रतीच्या कामामुळे नागरिकांचा संतप्त आरोप
कऱ्हाड-माण परिसराची महत्त्वाची जीवनवाहिनी असलेला मल्हारपेठ ते मायणी रस्ता उद्घाटनाआधीच भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या (CC Road) या नव्या रस्त्याला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा (तडे) गेल्या असून, सार्वजनिक पैशाचा कशा प्रकारे अपहार सुरू आहे, याची पोलखोल यामुळे झाली आहे.
प्रमुख मुद्दे व आरोप: उद्घाटनापूर्वीच दुरवस्था: अद्याप रस्त्याचे अधिकृत लोकार्पणही झालेले नाही, तोवरच पृष्ठभागावर तडे आणि खड्डेसदृश तिळिंबा सुटू लागल्या आहेत.
विशाल आर्थिक उलाढाल: सुमारे ४८० कोटी रुपये खर्चाचे हे महत्त्वाचे काम.प्रत्यक्ष पाहणीचे वास्तव: आम्ही स्वतः केलेल्या पाहणीत ठीक ठिकाणी रस्त्याला भेगा व अनेक ठिकाणी अतिशय खराब प्रतीचे काम आढळून आले.
मल्हार पेठ ते मायणी रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे या मध्ये संबंधित ठेकेदार यांनी अत्यंत खराब प्रतीचे काम केल्या मूळ रस्ता जागोजागी भेगळला आहे तर अनेक ठिकाणी रस्ता हा एकदम खराब कॉलिटी मध्ये झाला आहे तरी जेवढ्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे त्या ठिकाणचा रस्ता हा त्यांनी स्व खर्चाने परत करून दिला जावा आणि त्याला ब्लॅक लिस्ट करावे .संदीप घाडगे सामाजिक कार्यकर्ते शिवडे
कऱ्हाड-माण परिसराची महत्त्वाची जीवनवाहिनी असलेल्या मल्हारपेठ ते मायणी रस्त्याच्या सुमारे ४८० कोटी रुपये खर्चाच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचे समोर आले आहे. आम्ही स्वतः या रस्त्याची पाहणी केली असता, ठीक ठिकाणी या रस्त्याला भेगा पडल्या आहेत तर अनेक ठिकाणी अतिशय खराब प्रतीचे काम केले गेले आहे, हे वास्तव उघड झाले आहे. कोट्यवधींच्या निधीचा विनियोग दर्जेदार कामाऐवजी मलिदा लावण्यासाठी होत असल्याची पोलखोल यामुळे झाली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य: काँक्रीट्रीकरणात सिमेंट, वाळू, खडी आणि लोखंडी जाळीच्या वापराबाबत तांत्रिक निकषांची पायमल्ली झाली आहे.क्युरिंगचा फज्जा: काँक्रीटल्यानंतर आवश्यक असणारी पाण्याची प्रक्रिया (क्युरिंग) न केल्याने रस्ता भुसभुशीत झाला आहे.अधिकारी-ठेकेदार साटेलोटे: या कामात आर्थिक मलिदा लावण्यासाठी संबंधित विभागाचे अभियंता आणि कंत्राटदार यांच्यातले लागेबांधे असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नागरिकांच्या ठाम मागण्या:
1. तांत्रिक लेखापरक्षण (Technical Audit): स्वतंत्र व निष्पक्ष यंत्रणेकडून या रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी.
2. दोषींवर कारवाई: निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर प्रशासकीय/फौजदारी कारवाई करावी.
3. पुनर्काम: ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने भेगाळलेला रस्ता पुन्हा उखडून दर्जेदार करून द्यावा.
"वाहनांच्या वर्दळीचा हा रस्ता काही महिन्यांतच उखडला तर याला जबाबदार कोण? सर्वसामान्यांच्या करा, महसुलाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी संतप्त नागरिक व वाहनचालक यांच्या कडून केली जाते आहे .



Comments
Post a Comment