शिरवडे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलच्या वतीने ध्वनी प्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली.
शिरवडे दि. 9:- रवी वाकडे
शिरवडे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलच्या वतीने ध्वनी प्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली.शिरवडे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलच्या वतीने ध्वनी प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.
या रॅलीमध्ये तळबीड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक व डीजेचा वापर करताना नियमांचे पालन करण्याची आवश्यकता तसेच वाहतूक शिस्त याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर फलक व घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांना "डॉल्बीमुक्त उत्सव", "ध्वनी प्रदूषणमुक्त परिसर" आणि अनावश्यक हॉर्नचा वापर टाळण्याचे आवाहन केले. ध्वनी प्रदूषणामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले.
शाळा, पोलीस विभाग आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून ध्वनी प्रदूषणमुक्त व शांततामय वातावरण निर्माण करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.



Comments
Post a Comment