बेलवडे हवेली येथे तळबीड पोलिसांचा ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद

 



बेलवडे हवेली येथे तळबीड पोलिसांचा ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद.

       

बेलवडे हवेली दि १२ : रवी वाकडे 
     
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तळबीड पोलीस ठाण्याच्या वतीने बेलवडे हवेली येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या व सुरक्षिततेबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांना घराची व वैयक्तिक सुरक्षितता, अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे, मोबाईल व ऑनलाइन फसवणूक टाळणे, बँकिंग व्यवहारातील खबरदारी, एटीएम व ओटीपीची माहिती कोणालाही न देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अडचण, फसवणूक अथवा संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत डायल 112 या सुविधेचा वापर करण्याबाबतही माहिती देण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी तळबीड पोलीस ठाणे सदैव तत्पर असून, “ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता ही पोलिसांची जबाबदारी आणि समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी तळबीड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच बेलवडे हवेली येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Comments