सोनापूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते संपन्न.


सोनापूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते संपन्न.
नागठाणे दि 15 :- रवी वाकडे
सोनापूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते संपन्न.
 सोनापूर  येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मा. श्री. मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोजदादा घोरपडे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे सर, सरपंच सौ. सुनंदा खरात,  उमेश नावडकर, कृष्णत बागल सर, बजरंग बागल, विजय नावडकर, गणेश जाधव विक्रम बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना *आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले,* "कराड उत्तर मधील प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आजपर्यंत जो विकास झाला नाही, त्याच्या कित्येक पटीने सर्व विभागांमध्ये विकासकामे होत आहेत. सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेकांचे प्रवेश होत असून, जुने आणि नवे कार्यकर्ते यांनी आपापसात समन्वय साधून गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे," असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विजय नावडकर यांची सोनापूर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कीर्तीकुमार नावडकर, शिवाजी डांगे, धनाजी नावडकर, प्रदीप बागल, ज्ञानेश्वर बागल, विकास बागल, हिंदुराव बागल, रमेश नावडकर, बाळकृष्ण बागल यांच्यासह गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments