तारळे ग्रामीण आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील सुविधाच नाहीत; तारळे परिसरातील नागरिकांच्या जीविताशी खेळ


ग्रामीण आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील सुविधाच नाहीत; तारळे परिसरातील नागरिकांच्या जीविताशी खेळ.
तारळे दि 26:- राणी जाधव
पावसाळा संपल्यानंतर ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते, हे सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. मात्र, तारळे, आवर्डे, सासपडे परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यावर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या जीविताशी खेळ होत आहे.

काही महिन्यांपूर्वी आवर्डे येथील एका निवृत्त शिक्षकाला साप चावला असता १०८ रुग्णवाहिका केवळ सासपडेपर्यंतच आली. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांना स्वतःच्या वाहनाने अत्यंत वेगाने सातारा गाठावे लागले. वेळेवर उपचार मिळाले नसते तर अनर्थ घडला असता.

सध्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये रक्त गोठण्याची वेळ (Clotting Time) तपासण्याची सोय नाही, तसेच सर्पदंशावरील अत्यावश्यक असणारे प्रतिविष (Anti-Snake Venom) देखील उपलब्ध नाही. रात्री-अपरात्री कोणतीही तातडीची वैद्यकीय सेवा मिळत नाही.

प्रशासनाला आमचा सवाल आहे की, ग्रामीण भागातील जनतेच्या जिवाची काही किंमत आहे की नाही? शासनाने तातडीने प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील औषधे आणि सुविधा उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे.

Comments