भीमसेन महाराज की जय !,कुंती माता की जय ! च्या जय घोषात ,भीम - कुंती यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
भीमसेन महाराज की जय !,कुंती माता की जय ! च्या जय घोषात ,भीम - कुंती यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
सातारा, दि. ०७ - रविंद्र
वाकडे.
भीमसेन
महाराज की जय !,कुंती
माता की जय ! च्या जय घोषात ' उंब्रज, ता.कराड
, जि.सातारा
येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला भीम - कुंती यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात
नुकताच साजरा करण्यात आला.
मोठी
ऐत्याहासिक परंपरा व अध्यात्मिक वारसा लाभलेला भीम व कुंती माता भेटीचा सोहळा ' भीमसेन
महाराज की जय !,कुंती
माता की जय ! ' अशा
घोषणा देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.चालू वर्षी कुंती मातेला अश्वारूढ
रथात घेवून विराजमान होणाऱ्या लिलावाची बोली भीमसेन महाराज की जय !,कुंती माता की जय ! च्या जय घोषात ,भीम - कुंती यात्रा महोत्सव ' उंब्रज, ता.कराड , जि.सातारा येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला भीम
- कुंती यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.
मोठी
ऐत्याहासिक परंपरा व अध्यात्मिक वारसा लाभलेला भीम व कुंती माता भेटीचा सोहळा ' भीमसेन
महाराज की जय !,कुंती
माता की जय ! ' अशा
घोषणा देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.चालू वर्षी कुंती मातेला अश्वारूढ
रथात घेवून विराजमान होणाऱ्या लिलावाची बोली उंब्रज येथील मा.प्रणव प्रल्हाद जाधव यांनी मिळवला या साठी 50 हजार रु पासून लिलावाची
बोलि सुरु झाली ती बोली १२५००० रु ला फायनल झाली, प्रणव प्रल्हाद
जाधव यांनी कुंती मातेच्या रथात
बसण्याचा बहुमान मिळवला.
दरवर्षी बेंदरापासून या उत्सवाला सुरुवात होते.श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी या यात्रेचा मुख्य दिवस असतो.या दिवशी होणारी भीम - कुंती ची भेट हे या उत्सवाचे मोठे आकर्षण असते.या दिवशी सकाळ पासून भीमसेन मंडळ व ग्रामस्थ यांची उत्सवाची लगबग सुरू होते.यात्रा सोहळा पार पाडण्यासाठी सकाळी 11 वा.पासून भीम मंडपात कुंती मातेला रथात घेवून बसण्याच्या लिलाव बोलीला सुरूवात झाली .
परंपरेनुसार
श्री.महामुनी यांच्या घरात तयार केलेल्या कुंती मातेच्या मूर्तीचे विधिवत पूजन
करण्यात आले.दुपारी
१
वाजनेच्या आरती आणि पूजा करून सुमारास नंतर
कुंती मातेला फुलांनी सजवलेल्या अश्वारूढ रथात घेवून श्री.अजय जाधव बसले. या नंतर ' कुंती
माता की जय !' या
घोषणेचा जयघोष करण्यात आला.त्या नंतर भीमसेन मंडळ सह ग्रामस्थ यांनी श्री.महामुनी
यांचे घरापासून मिरवणुकीस प्रारंभ केला.यावेळी मिरवणुकी समोर वाद्यवृंद, डिजे, बँडपथक
यावर थिरकणारी तरुणाई असा सर्व लवाजमा होता.पुढे मिरवणूक ग्रामदैवत
श्री
भैरवनाथ
मंदिरासमोरून
ग्रामपंचायत
चावडी चौक - मुख्य रस्ता मार्गे बाजार पेठेत आली.पुढे सेवा रस्त्यावरून पाटण
तिकाटणे मार्गे कॉलेज रस्त्याला असणाऱ्या वेशीवरील श्री मारुती
मंदिराला वळसा घालून पुन्हा बाजार पेठेच्या दिशेने निघाली.या वेळी रस्त्याच्या
दुतर्फा असलेल्या भाविकांनी टाळ - मृदंगाच्या गजरात श्री कुंती मातेचे दर्शन
घेतले.
त्या
नंतर भीम व कुंती मातेच्या भेटीचा अनोखा सोहळा येथे सायंकाळी
पार पडला.हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.या वेळी मानकरी
यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.त्या नंतर कुंती मातेला अर्पण करण्यात
आलेल्या खण,नारळ , घोणची
या वस्तूंचा लिलाव झाला.त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या
यात्रा महोत्सवात खेळण्यांचे पाळणे,स्टॉल्स,विविध प्रकारची दुकाने,करमणुकीची साधने,मेवा मिठाईची दुकाने ,लहान मुलांच्या खेळण्याची
दुकाने ,फिरते
उंच पाळणे बाजार पेठेत दाखल झाली होते.याचा मोठ्यांसह सर्व बाल चमूने आनंद लुटला.




Comments
Post a Comment