शामगाव उपसा सिंचन योजनेची लवकरच निविदा काढणार - आमदार मनोजदादा घोरपडे.
कराड दि 30 :- रवी वाकडे
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मौजे शामगाव येथील अनेक वर्षांचा प्रलंबित असणारा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक दोन मधील शामगाव उपसा सिंचन योजनेची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची ठाम ग्वाही कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
आज शामगाव येथील ग्रामस्थांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांची भेट घेऊन पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे, रणजीत जाधव व हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार घोरपडे म्हणाले,
"मी आपल्या गावचा पाणी प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात मांडला होता. त्यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून शामगाव उपसा सिंचन योजनेचे सर्व सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक दोन मधील शिवाजीनगर तलावातून शामगाव, पाचुंद, राजाचे कुर्ले,गोरेगाव पारगाव गावांना पाणी मिळणार असून येत्या सहा महिन्यांत या कामाचे टेंडर निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
या आठवड्यामध्ये शामगाव उपसा सिंचन योजनेच्या कामासंदर्भात प्रशासकीय बैठक ग्रामस्थ व अधिकारी यांच्यासह घेऊन संपूर्ण सर्वेक्षण आपणासमोर मांडण्यात येईल.
आमदार मनोजदादा घोरपडे .
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, "केवळ वल्गना करणाऱ्यांच्या मागे न जाता, प्रत्यक्षात काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. शामगावचा पाणी प्रश्न हा महायुती सरकारच्या माध्यमातूनच सुटणार आहे, याचे भान सर्वांनी ठेवावे."
तसेच गावातील इतर विकास कामांबाबतही यावेळी सविस्तर चर्चा झाली असून साठवण तलावाचे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही आमदार घोरपडे यांनी सांगितले.
यावेळी *डॉ. सचिन पोळ, सुरेश भाऊ, प्रल्हाद पाटील, मुरली शेठ, आयुब मुल्ला, महेंद्र जाधव, सचिन डांगे, ईश्वर पाटील, ज्ञानेश्वर पोळ, शुभम पोळ, योगेश फाटक, प्रदीप पोळ, गोविंद जाधव, जगदीश लवंड, विजय पाटोळे, शंकर पोळ, बाळकृष्ण शिंदे* यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment