कराड हादरले! कै क्रांतीवीर माधवराव जाधव बालग्रह कराड येथील १४ वर्षीय निशांत शीलवंत याचा उपचारादरम्यान मृत्यू; संस्था चालकांच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावल्याचा आईचा थेट आरोप.
कराड हादरले ! कै क्रांतीवीर माधवराव जाधव बालग्रह कराड येथील १४ वर्षीय निशांत शीलवंत याचा उपचारादरम्यान मृत्यू; संस्था चालकांच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावल्याचा आईचा आरोप.
कराड दि 29 :- प्रतिनिधी
कराड हादरले!
कै क्रांतीवीर माधवराव जाधव बालग्रह कराड येथील १४ वर्षीय निशांत शीलवंत याचा उपचारादरम्यान मृत्यू; संस्था चालकांच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावल्याचा आईचा थेट आरोप
कराड येथील क्रांतीवीर माधवराव जाधव बालगृहातील १४ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा हलगर्जीपणाचाआरोप ?
बौद्ध वस्ती, वडगाव (उंब्रज )येथे राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने 'क्रांतीवीर माधवराव जाधव बालगृह, निरिक्षणागृह कराड' येथील कर्मचाऱ्यांवर कामात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप केला असून, पोलिसांत अधिकृत जबाब नोंदवला आहे.
काय आहे नेमकी घटना?मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा निशांत नितीन शिलवंत (वय १४ वर्षे, जन्म १६/०५/२०१३) हा गेल्या काही काळापासून कराड येथील क्रांतीवीर माधवराव जाधव बालगृहात शिक्षणासाठी राहत होता. फिर्यादी आईने दिलेल्या जबाबानुसार, दि.१०/०९/२०२६ रोजी बालगृहाच्या अधीक्षकांनी त्यांना फोन करून सांगितले की, निशांत रुसला असून तो जेवण करत नाही, त्यामुळे तुम्ही त्याला घरी घेऊन जा. त्यांनतर नातेवाईक त्याला घरी घेऊन आले.घरी आल्यानंतर निशांतची तब्येत बिघडली. त्याला उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्याला तात्काळ कराडमधील उपजिल्हा रुग्णालयात (कॉटेज हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी सांगली किंवा कोल्हापूर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
उपचारादरम्यान मृत्यू आणि हलगर्जीपणाचा आरोप निशांतची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर (CPR) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात (ICU) त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दि. ११/०९/२०२६ रोजी पहाटे २:०० वाजल्यापासून त्याच्यावर डायलिसिस व इतर उपचार सुरू होते. दुर्दैवाने, त्याच दिवशी (दि. ११/०९/२०२६) दुपारी ०३:३० वाजता उपचारादरम्यान निशांतचा मृत्यू झाला.फिर्यादी आईने आरोप केला आहे की, बालगृहात असताना निशांतला योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळल्यामुळे आणि तेथील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
पोलीस तपास सुरूया घटनेनंतर दि. १२/०९/२०२६ रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन (Post Mortem) करून पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (SI) विजय भागवत गोडसे यांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, घटनेचा पुढील तपास अधिकृतपणे हाती घेतला आहे.
Comments
Post a Comment