महाराष्ट्राचा राज्य उत्सव हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये मोठ्या जल्लोषात साजरा.
सातारा, दि.26:- प्रा. अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित, हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, म.फुले प्राथमिक शाळा,प्रेरणा पूर्व प्राथमिक केंद्र येथे महाराष्ट्र राज्य उत्सव असलेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात शनिवार ,दि.14 ते शुक्रवार, दि.25 सप्टेंबर अखेर अनेक अभिनव उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या वर्षीची श्री गणेश मूर्ती शाळेचे माजी विद्यार्थी व हितचिंतक सौ.व श्री.मुन्ना नजीर शेख यांनी दान करून ,हिंदू - मुस्लीम ऐक्याचा एक अनोखा संदेश करून दिला.
या अनुषंगाने सर्व वर्ग तुकड्यांच्या वतीने रोज सकाळ - संध्याकाळ महाआरती करण्यात येवून,प्रसादाचे वाटप करण्यात आले.उत्सव काळात वक्तृत्व,निबंध,हस्ताक्षर,चित्रकला, गायन ई.स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
श्री गणपती बरोबर श्री गौरी प्रतिष्ठापन पण करण्यात आली होती.त्यासाठी अतिशय उत्कृष्ठ व मनमोहक रंगीबिरंगी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
या नंतर माता व पिता पालक यांच्यासाठी पानसुपारी व हळदी - कुंकू समारंभाचे आयोजन गुरुवार दि.24 रोजी, दु.3 ते संध्या.7 या वेळेत करण्यात आले होते.
या निमित्त श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले.यावेळी तंत्र स्नेही माजी प्राचार्य सुधाकर माने सर व प्राचार्या बी.एस.माने मॅडम यांच्या हस्ते सर्व पूजन विधी सचिन कुलकर्णी शास्त्री यांच्या पौरोहित्या सह सात्विक व शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला .यावेळी रांगोळी,चित्रकला,हस्तकला,हस्ताक्षर व कार्यानुभव प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मा.प्राचार्या बी.एस.माने मॅडम व ज्युनिअर कॉलेज विभाग स्टाफ तर्फे करण्यात आलेली शाळा संकुलाची आकर्षक प्रतिकृती ने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.येथेच ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन पण भरवण्यात आले होते.शिक्षक रांगोळी दालनात सौ. एन.आर.जाधव ,सौ. एन.पी.पंडीत,सौ.एस. व्ही.कुंभार मॅडम यांच्यासह श्री. व्हि. डी.राऊत,श्री. सी.जे.बहिरम,चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्रीरंग दुबळे यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या सर्वांच्या कौतुकाचा विषय बनल्या .स्वागत दालनात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे शाळेच्या सर्व कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येत होते.शाळा आवारात सुश्राव्य वाद्यवृंदाच्या आवाजात लेझीम,टिपरी,रेकॉर्ड डान्स व राधेचा माठ असे विद्यार्थी - विद्यार्थी यांचे सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रम मोठ्या जल्लोषात सादर करण्यात आले.यावेळी अनेक राजकीय व सामाजिक नेते व कार्यकर्ते , माजी शिक्षक यांनी भेट देवून कौतुक केले.
शुक्रवार, दि.25 रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक स.9 वा. सुरू करण्यात आली.छ.शिवाजी चौकात पोलीस स्टेशन चे सहा .पोलीस निरीक्षक श्री. करचे साहेब व संचालक सतीश शेटे ,अशोक भंडारे यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आला.
या मिरवणुकीचे खास वैशिष्टय म्हणजे महाराष्ट्राची भक्ती परंपरा असलेली पंढरपूरची दिंडी वारी सादर करण्यात आली.यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी श्री निवृत्तिनाथ ,ज्ञानेश्वर,सोपान
देव व मुक्ताबाई व स्त्री - पुरुष वारकरी यांच्या जीवनावरील जिवंत देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले होते.या नंतर सर्व शिक्षक - शिक्षिका यांनी हातामध्ये टाळ,मृदंग घेवून ओळीने मार्गक्रमण सुरू केले.पुढे हुतात्मा चौक ,श्री हनुमान चौक,शेतकरी चौक व बाजार चौक येथे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. येथे राम-कृष्ण- हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोषात रिंगण फेरी नृत्य,फुगड्या,फेर ,भजन गायन यांचे सादरीकरण करण्यात आले.च्या यावेळी सर्व गणेश मंडळे, माजी विद्यार्थी,पालक व हितचिंतक, व्यापारी यांच्या वतीने सर्वांसाठी लस्सी पाकिटे,चॉकलेट व गोळ्या पुडे तसेच रोख रकमेची बक्षिसे प्रदान करण्यात येवून,सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला.बाजार चौक येथे श्री गणेश मंदिर प्रांगणात सर्वांसाठी अल्पोपहार व चहा वाटप करण्यात येवून,येरळा नदीवर श्री गणेश विसर्जन पार पडले.
कार्यक्रमाला चेअरमन गोविंद भंडारे, व्हॉईस चेअरमन विजय म्हामणे, सचिव सचिन काळे,स्कूल कमिटी अध्यक्ष संतोष कांबळे,ज्येष्ठ संचालक सुभाष येवले, डॉ.हेमंत पेठे,अशोक भंडारे, गजानन शेटे,प्रशांत शेटे,नितीन जाधव,संजय येवले, ज्ञानेश्वर पंडीत,शैलेश देशपांडे,रविराज काळे , माजी प्राचार्य एम.एस.गोडसे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रेरणा दिली.
सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या सौ.बी.एस.माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाने उप मुख्याध्यापिका सौ.एस.पी.जोशी,पर्यवेक्षक ए.एम.राऊत, व्हि. टी.पवार,कार्याध्यक्ष आर.एस.जगदाळे,खजिनदार सौ.आर.सी.जाधव ,मुख्याध्यापिका एस. जी.शिंदे मॅडम, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.आर.बी.येलमर यांच्या सह सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी ,पालक वर्ग, ट्रॅक्टर मालक महेन्द्र फडतरे,जावीर बंधू वाद्यवृंद, वाकेश्वर,गुरव साऊंड सिस्टीम, गोपूज यांच्या सहकार्याने अतिशय उत्कृष्ठ पणे पार पडला.
Comments
Post a Comment