उंब्रजचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जि. प. सदस्य मारुती शेठ जाधव यांचे निधन.


उंब्रजचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जि. प. सदस्य मारुती शेठ जाधव यांचे निधन.
उंब्रज 19 :-  रवी वाकडे
उंब्रज  परिसरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मारूतराव गणपतराव जाधव  (मारुती शेठ दादा) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उंब्रजसह संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जनसामान्यांचे मार्गदर्शक आणि अडीअडचणीच्या काळात नेहमी धावून जाणारे हक्काचे नेतृत्व गमावल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.कै. मारुती शेठ जाधव यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत उंब्रज परिसराच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली. 

प्रत्येकाला मदतीचा हात देणारे आणि आपल्या प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.उंब्रजचे जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव यांचे ते चुलते होत. कै. मारुती शेठ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, रणजित जाधव यांच्यासह दोन पुतणे आणि असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि राजकीय नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना  समस्त उंब्रज कर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .

Comments