
कल्पनाताई जाधव यांची अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या 'पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी' निवड.
सातारा दि १६ : रवी वाकडे
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाजात भरीव योगदान देणाऱ्या सातारा येथील कल्पनाताई जाधव यांची 'अखिल भारतीय कैकाडी महासंघा'च्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी नुकतीच जाहीर निवड करण्यात आली आहे.
कल्पनाताई जाधव या सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीस (फादरबॉडी )पासून ते महिला मोर्चा उपाध्यक्षा तसेच अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या सातारा जिल्हा महिलाध्यक्षा म्हणून धडाडीने कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण हा मुख्य उद्देश नजरेसमोर ठेवून त्या सातत्याने काम करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत, समाजहितासाठी आणि समाजातील सर्व भगिनींच्या अडीअडचणींना धावून जाणारे एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
ही महत्त्वपूर्ण निवड अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे राज्याध्यक्ष श्री. संजयजी मेढे साहेब यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. यावेळी राज्य सरचिटणीस श्री. गोरख माने साहेब, प्रा. श्री. कैलाश जाधव सर, राज्य संघटक श्री. विनोद जाधव सर, राज्य सल्लागार श्री. मानसिंगराव जाधव, राज्य उपाध्यक्ष श्री. विश्वासराव माने साहेब, श्री. मोहन जाधव साहेब, राज्य सहसचिव श्री. नवनाथ जाधव साहेब, महिला अध्यक्ष संगीता ताई माने 'उपाध्यक्षा शैलजाताई जाधव . ' प.म.कार्याध्यक्ष श्री. जित कोरवी साहेब, महिला उपाध्यक्षा सौ. कमल जाधव मॅडम, महिला सचिव ललिता मॅडम, सातारा जिल्हाध्यक्ष श्री. दादासाहेब जाधव, युवक अध्यक्ष श्री. राजेंद्र माने साहेब यांच्यासह राज्य कार्यकारणी .पदाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीने मिळून ही निवड जाहीर केली.
राज्य कार्यकारिणीने त्यांच्यावर टाकलेला हा विश्वास कल्पनाताई जाधव नक्कीच सार्थ ठरवतील, अशी अपेक्षा समस्त कैकाडी समाज बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
महिलांचे हक्क आणि सक्षमीकरणासाठी कटिबद्ध : कल्पनाताई जाधव
या निवडीबद्दल बोलताना कल्पनाताई जाधव यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आभार व्यक्त केले आहेत. तसेच, "महासंघाची ध्येयधोरणे जपत, सामाजिक संघटन मजबूत करणे आणि महिलांच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने आणि समाजातील सर्व स्तरांतून भरभरून सदिच्छा दिल्या जात आहेत.


Comments
Post a Comment