हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

 

     

हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

सातारा,दि.13 - प्रा.अजय शेटे.

वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथील वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज मध्ये प्राचार्या  सौ. बी.एस.माने मॅडम यांच्या कल्पक मार्गदर्शनाने ,प्रा.सौ.हर्षदा राम माने  मॅडम यांनी शनिवार दि.12 रोजी दु.1.30 ते 3 या वेळेत कला - कौशल्य व कारागिरी विषयक मार्गदर्शन कार्यक्रम अतिशय उत्कृष्ठ रित्या सादर केला.

या कार्यक्रमात त्यांनी रंगीबिरंगी रांगोळ्या कौशल्य,रंगीत तार वायर पासून विविध प्रकारची रंगीबिरंगी पाने,फुले,महिला केश भूषेतील विविध प्रकारचे लहान - मोठे चाप,गळ्यातील सुशोभित माळा,हातातील रंगीत बेल्ट स,फ्लॉवर पॉट निर्मिती तसेच इतर नाजूक कला कौशल्याच्या जीवनोपयोगी वस्तू कशा तयार करायच्या याचे उत्कृष्ठ प्रात्यक्षिक माहितीसह सादर केले.

यावेळी त्या म्हणाल्या की,श्री गणपती - गौरी ,दिवाळी तसेच इतर अनेक सण - उत्सव कार्यक्रमात सर्वांना अशा सुशोभित वस्तूंची गरज सजावट व वैयक्तिक वापरासाठी लागतात.बाजारात या वस्तूंचे मूल्य जास्त महाग असते तसेच त्या वेळेवर उपलब्ध होतील ,असे सांगता येत नाही.पण याच वस्तू तयार करण्याचे कौशल्य आपल्या स्वतःजवळ असेल तर आपण तात्काळ कच्चा मला खरेदी करून,अतिशय स्वस्तात अशा वस्तू तयार करून ,ऐनवेळी त्वरित वापरू शकतो.या बाबत माझे सर्वांना कायम मार्गदर्शन राहील.

 ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.आर.बी. येलमर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की,आज सर्वांना शिक्षण घेवून नोकरी मिळेल असे सांगता येत नाही.शिवाय प्रत्येकाला त्याची गरज वाटेलच असे नाही.पण अशा व्यक्ती आपले सांसारिक कार्य करत फावल्या वेळेत अशा वस्तू बनवून अर्थार्जन करू शकतात.




 त्यांचे प्रा.सौ. व्ही.एस.काळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच त्यांना शाळे तर्फे प्रशंसा पत्र व मानधन प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सौ.जे.एस.पाटील यांनी केले.यावेळी त्या म्हणाल्या की, आजच्या मार्गदर्शिका सौ.हर्षदा माने मॅडम या स्वतः उच्च विद्या विभूषित असून,त्यांचे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए आहेत . त्यांच्यामुळे ज्या वयात काही कला कौशल्य शिकण्याची वेळ असते.त्याच वेळी अशा प्रकारचे मार्गदर्शन तरुण विद्यार्थी - विद्यार्थिनी यांना मिळाले तर त्याचा त्यांच्या जीवनाला निश्चितच फायदा होऊन जाईल.या उद्देशानेच या कार्यक्रमाचे आयोजन येथे केले गेले.

या कार्यक्रमाला प्रा.एस. जी. तिवाटणे ,प्रा. पी.एस.कुलकर्णी,प्रा.एन.एस.मगर,प्रा. जे.एस.कुलकर्णी,प्रा.सौ.आर.एम.डोंबे, प्रा.सौ.व्ही.व्ही.कोकाटे,प्रा. ए. व्ही.शेटे यांच्या सह सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी हजर होत्या.या वेळी त्यांनी अनेक प्रश्न विचारून स्वतःचे शंका निरसन करून घेतले व अधिक माहिती जाणून घेतली.तसेच प्रत्येक हस्त कला कौशल्य सादर झाल्या नंतर वाहवा करत , टाळ्या वाजवत प्रेरणादायी प्रतिसाद दिला.त्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.तसेच भावी काळात अजून अधिक माहिती जाणून घेवून,नवनवीन कला कौशल्य आणि कारागिरी शिकण्याचा मनोदय  व मानस व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा सौ.एम.एस.काळे मॅडम यांनी केले.



Comments