पाल (ता. कराड) येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणास बेदम मारहाण; चारचाकी गाडीचीही तोडफोड, सहा जणांवर गुन्हा दाखल
पाल (ता. कराड) येथे जुन्या भांडणाच्या
रागातून तरुणास बेदम मारहाण; चारचाकी गाडीचीही तोडफोड, सहा
जणांवर गुन्हा दाखल.
उंब्रज दि १५ : रवी वाकडे
कराड
तालुक्यातील पाल येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाला व त्याच्या भावाला
लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्यांच्या चारचाकी गाडीची तोडफोड केल्याची
धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) रात्री साडेनऊ वाजण्याच्या
सुमारास पाल येथील अजिंक्य गणेश मंडळासमोर ही घटना घडली. याप्रकरणी उंब्रज पोलीस
ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज
प्रमोद शिंदे, प्रसाद सुकटे, शुभम
भोसले, करण एटणे, प्रमोद
शिंदे आणि गणेश भोसले (सर्व रा. पाल,
ता. कराड, जि.
सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत ओंकार
दत्तात्रय पवार (वय २६, व्यवसाय शेती, रा.
पाल, ता. कराड) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार पवार हे सोमवारी रात्री
साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पाल गावच्या हद्दीत त्यांच्या घरासमोर असलेल्या
अजिंक्य गणेश मंडळासमोर थांबले होते. यावेळी श्री दत्त गणेश मंडळ, पाल
चे सदस्य असलेले वरील सर्व आरोपी तेथे आले. कोणत्याही कारणाशिवाय जुन्या भांडणाचा
राग मनात धरून आरोपी राज शिंदे, प्रसाद सुकटे व शुभम भोसले यांनी ओंकार
यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार मारहाण केली. त्यानंतर करण एटणे, प्रमोद
शिंदे व गणेश भोसले यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धक्काबुक्की केली.
स्विफ्ट गाडीचे मोठे नुकसान आरोपींनी
एवढ्यावरच न थांबता ओंकार पवार यांच्या मालकीच्या स्विफ्ट गाडीची (क्र. MH-50-A-5877) तोडफोड केली व गाडी चेपवून मोठे नुकसान केले. यावेळी ओंकार
यांचा भाऊ आदित्य यालाही आरोपी राज प्रमोद शिंदे याने विनाकारण लाकडी दांडक्याने
मारहाण करून जखमी केले.
या
घटनेनंतर ओंकार पवार यांनी मंगळवारी (दि. १५) पहाटे उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेत
तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून उंब्रज पोलिसांनी सहाही आरोपींविरुद्ध
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२)
आणि ३२४(२) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ३७९/२०२६) दाखल केला आहे.
या
गुन्ह्याची नोंद दाखल अंमलदार पोलीस नाईक डांगरे यांनी केली असून, आरोपींना
अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार हे करत
आहेत. गावात ऐन गणेशोत्सवाच्या काळात दोन मंडळांच्या सदस्यांमध्ये वाद झाल्याने
परिसरात खळबळ उडाली आहे.
.jpg)

Comments
Post a Comment