गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उंब्रजची वाहतूक व्यवस्था सुधारली, स्वतः दुचाकीवरून पाहणी करत असल्याने गणेश भक्तांकडून कौतुक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन;
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उंब्रजची वाहतूक व्यवस्था सुधारली, स्वतः दुचाकीवरून पाहणी करत असल्याने गणेश भक्तांकडून कौतुक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजण.
उंब्रज दि १४ :- रवी वाकडे
उंब्रज शहरातील वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच असली, तरी गणेशोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर उंब्रज पोलिसांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या
नियोजनाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. उंब्रज पोलीस ठाण्याचे कारभारी पंकज पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यात आल्याने गणेश
आगमनाच्या तोंडावर शहरातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होताना दिसत आहे.
उंब्रज हे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र
असून येथून उंब्रज-पाटण-चिपळूण हा कोकणाकडे जाणारा प्रमुख मार्ग जातो. त्यामुळे
स्थानिक वाहनांसोबतच कोकणाकडे जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ
उंब्रज मधून होत असते. या बाह्य वाहतुकीचा अतिरिक्त भार गावातील सेवारस्ता व
अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवर पडतो. त्यातच बाजारपेठ, प्रमुख चौक, बसस्थानक परिसर आणि
गणेशोत्सव काळातील वाढणारी भाविकांची गर्दी यामुळे वाहतूक व्यवस्थेसमोर मोठे
आव्हान निर्माण होते.
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे कार्यकर्ते, भाविक, दुचाकी-चारचाकी वाहने
तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी होण्याची
शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांकडून प्रमुख ठिकाणी वाहतुकीवर लक्ष
ठेवण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी वाहनांची हालचाल सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
केले जात आहेत.
विशेष म्हणजे पंकज पवार हे स्वतः दुचाकीवरून शहरातील विविध
भागांत फेरफटका मारून वाहतूक व्यवस्थेची पाहणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. केवळ
कार्यालयात बसून सूचना देण्याऐवजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा
घेत असल्याने नागरिक तसेच गणेश भक्तांकडून त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जात
आहे.
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव असल्याने या काळात
भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनांनाही अडथळा
निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून
करण्यात आलेले नियोजन महत्त्वाचे ठरत आहे.
उंब्रजमधील नेहमीची वाहतूक समस्या, त्यात कोकण मार्गावरील
अतिरिक्त वाहतुकीचा भार आणि गणेशोत्सवातील वाढती गर्दी असे तिहेरी आव्हान असतानाही
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे नागरिकांकडून
कौतुक होत असून समाधान व्यक्त केले जात आहे.




Comments
Post a Comment